Asian Games 2023 : दोन भारतीयांची फायनलमध्ये लढत, आणखी एक सुवर्ण आणि रौप्य निश्चित, मराठमोळा ओजस सुवर्णभेद करणार?
Asian Games 2023 : मंगळवारी भारताच्या तिरंदाजांनी शानदार कामगिरी करत दोन पदकं निश्चित केली आहेत.
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची लयलूट सुरुच आहे. भारताची पदकसंख्या 60 च्या पार गेली आहे. मंगळवारी भारताच्या तिरंदाजांनी शानदार कामगिरी करत दोन पदकं निश्चित केली आहेत. विशेष म्हणजे, सुवर्णपदाकासाठी दोन भारतीय खेळाडूंमध्ये लढत होणार आहे. यामध्ये मराठमोळ्या ओजस देवतळ याचा समावेश आहे. ओजस देवतळे मूळचा नागपूरचा आहे. ओजसने आज कम्पाऊंड आर्चरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय अभिषेख वर्मा यानेही फायनल गाठली आहे. आता कम्पाऊंड आर्चरीच्या फायनलमधे अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात कोण सुवर्णभेद करणार? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पण भारताला आणखी एक सुवर्ण आणि एक रौप्य निश्चित झाले.
Men's Individual Compound Archery Update🏹
— SAI Media (@Media_SAI) October 3, 2023
🇮🇳 Archers @archer_abhishek and Ojas Deotale win their quarterfinal bouts and advance to the semifinal.#KheloIndiaAthlete Ojas hits a perfect 150 out of 150, thus equaling the World Record
Abhishek pips his opponent during the… pic.twitter.com/FUQlNfOpZf
Asian Games 2023 Live: आजच्या दिवसातील पहिले पदक
भारताच्या अर्जुन सिंह आणि सुनिल सिंह यांनी पुरूष दुहेरी 1000 मीटर कॅनोई क्रीडा प्रकारात भारताला कांस्य पदक पटकावून दिले. या जोडीने 3.53.329 वेळ नोंदवत पदकावर कब्जा केला. दहाव्या दिवसातील भारताचे हे पहिले पदक होय. भारताची पदक संख्या 61 झाली.
Asian Games 2023 Live : क्रिकेट संघाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश
उप उपांत्य सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील भारतीय संघाने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. यशस्वी जयस्वाल याने शतक ठोकले तर रवि बिश्नोई याने तीन विकेट घेतल्या.
Asian Games 2023 Live: भारतीय महिला हॉकी संघाचा शानदार विजय
भारतीय महिला हॉकी संघाने अखेरच्या साखळी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने हाँगकाँगचा 13-0 च्या फरकाने पराभव केला. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहचला आहे.
Asian Games 2023 Live : ज्योती तीरंदाजीच्या फायनलमध्ये
भारताच्या ज्योती सुरेखा आणि अदिती गोपीचंद यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना झाला. यामध्ये ज्योतीने बाजी मारली. ज्योतीने अदितीचा 149-146 गुणांनी पराभव केला. या विजयासह ज्योतीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आदिती कांस्य पदकासाठी मैदानात उतरेल. तीरंदाजीमध्ये भारताचे पदक निश्चित झालेय.
Asian Games 2023: चंदा आणि हरमिलन यांची पदके निश्चित
महिलांच्या 800 मीटर रेसमध्ये चंदा आणि हरमिलन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोघींनी पदक निश्चित केले आहे.
Asian Games 2023 Live: 4x400 मीटर रिलेत भारत फायनलमध्ये
4x400 मीटर रिलेत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.मोहम्मद अनस याहिया, निहाल जोएल, अमोज जैकब आणि मिजा चाको कुरयिन या चौकडीने पदक निश्चित केले आहे.
Asian Games 2023 : कबड्डीमध्ये भारताचा विराट विजय
कबड्डीमध्ये भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली. भारताच्या पुरुष कबड्डी संघाने आपल्या पहिल्या साखळी सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव केला. भारताने 55-18 च्या फरकाने बांगलादेशचा पराभव करत 37 गुणांची कमाई केली.