एक्स्प्लोर
Advertisement
भारतीय हॉकी संघाचा हाँगकाँगवर 26-0 ने विजय
भारताने हाँगकाँगवर थोडाथोडका नव्हे तर तब्बल 26-0 असा एकतर्फी विजय मिळवला आहे.
जकार्ता: भारताच्या पुरुषांच्या हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये डंका वाजवला आहे. भारताने हाँगकाँगवर थोडाथोडका नव्हे तर तब्बल 26-0 असा एकतर्फी विजय मिळवला आहे.
यापूर्वी भारताने पहिल्या ग्रुप सामन्यात यजमान इंडोनेशियालाही चारीमुंड्या चीत करत 17-0 असा विजय मिळवला होता. आज भारतीय संघाने त्यापुढे मजल मारली.
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक सुरुवात केली. फॉरवर्डला असलेल्या आकाशदीपने पहिल्या दोन मिनिटातच गोल डागला. मग पुढच्या मिनिटाला मनप्रीत सिंहने दुसरा गोल केला.
पुढे जसा जसा वेळ सरकत गेला, तस तसे भारतीय हॉकीपटू गोल डागत गेले. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये चार गोल केले. रुपिंदर पाल सिंहने पेनाल्टी कॉर्नरच्या माध्यमातून दोन आणि एस व्ही सुनील आणि विवेक सागरने एक-एक गोल डागले.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक खेळ सुरुच ठेवत 8 गोल केले. मनदीप सिंह आणि ललित उपाध्यायने दोन दोन, मनप्रीत, हरमनप्रीत, अमित रोहिदास आणि वरुण कुमारने एक-एक गोल केले.
भारताने दुसऱ्या सत्रात गोल डागणं सुरुच ठेवत तब्बल 12 गोल केले. स्टार बचावपटू हरमनप्रीतने तीन आणि आकाशदीप, ललित आणि रुपींदरने दोन दोन गोल गेले.
याशिवाय दलप्रीत सिंह, चिंगलिंगसाना सिंह आणि सिमरनजीत सिंह यांनीही एक-एक गोल केला. एकंदरीत भारताचे गोल पाहता, गोलरक्षक वगळता सर्वांनीच गोल डागल्याची स्थिती पाहायला मिळालं. या विजयानंतर भारत सहा गुणांसह अ गटात अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सोलापूर
क्रीडा
Advertisement