![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Asia Cup 2022 : विराट कोहली आणि केएल राहुल भारतासाठी योग्य वेळी फॉर्ममध्ये येतील, माजी निवडकर्त्याचा दावा
Asia Cup 2022 : विराट कोहली आणि केएल राहुल आशिया कपमध्ये भारतीय टी20 संघात पुनरागमन करत आहेत. दोघेही बऱ्याच काळापासून खास फॉर्ममध्ये नसल्याने दोघांसाठी ही एक संधी आहे.
![Asia Cup 2022 : विराट कोहली आणि केएल राहुल भारतासाठी योग्य वेळी फॉर्ममध्ये येतील, माजी निवडकर्त्याचा दावा Ex indian Cricketer Saba Karim says virat kohli and kl rahul will be in form when india needed most Asia Cup 2022 : विराट कोहली आणि केएल राहुल भारतासाठी योग्य वेळी फॉर्ममध्ये येतील, माजी निवडकर्त्याचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/68fb1aa90a76f9ece93b9c6fe58f74fc1661606050347323_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Saba Karim On Virat Kohli And KL Rahul : भारतीय क्रिकेट टीमचा माजी यष्टीरक्षक आणि माजी निवडकर्ते सबा करीम (Saba Karim) यांनी भारताचे स्टार क्रिकेटकर विराट कोहली आणि केएल राहुल (Virat Kohli and KL Rahul) यांच्याबद्दल प्रतिक्रिया देत दोघेही योग्य वेळी भारतासाठी पुन्हा फॉर्ममध्ये येतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कोहली आणि राहुल दोघेही आशिया कपसाठी भारताच्या टी20 संघात पुनरागमन करणार आहेत. दोघांनीही मागील वर्षी युएईमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकानंतर सुमार प्रदर्शन कायम ठेवलं आहे. दोघांच्याही बॅटमधून हवे तसे रन येत नसल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान माजी क्रिकेटर सबा करीम यांनी स्पोर्ट्स 18 च्या 'स्पोर्ट्स ओवर द टॉप शो' या कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे की, "माझ्या टॉप ऑर्डरमध्ये कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली हे आहेत आणि ते त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पाकिस्तानसारख्या मोठ्या संघाविरुद्ध आणि आशिया कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास आहे.''
करीम यांनी पुढे बोलताना म्हटले की,''सूर्यकुमार यादवला भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्फोटक फलंदाज म्हणून वापरण्याचा पर्याय उत्तम आहे. वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध दमदार शॉट्स मारण्याव्यतिरिक्त, सूर्यकुमार कोणत्याही भूमिकेत चांगली कामगिरी करू शकतो, त्याने इंग्लंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर 117 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध सलामीवीर म्हणून 76 धावा केल्या आहेत.''
कसं आशिया कपचं वेळापत्रक?
ग्रुप स्टेजचे सामने
27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग
ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
हे देखील वाचा-
- IND vs PAK : यंदा आशिया चषकात 1, 2 नाही तर 3 वेळा भारत-पाकिस्तान सामना रंगण्याची शक्यता, वाचा सविस्तर
- Asia Cup 2022 : आशिया कपसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे मोठी जबाबदारी, बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)