AFG win Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला आजपासून (27 ऑगस्ट) युएईमध्ये  सुरुवात झाली असून सलामीच्या सामन्यातच अफगाणिस्तान संघाने (Afghanistan) दमदार विजयाची नोंद केली आहे. त्यांनी श्रीलंका संघाला 8 गडी राखून मात दिली आहे. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच अफगाणिस्तानने आधी अप्रतिम गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजीचं दर्शन घडवत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. सामन्यात आधी श्रीलंकेनं 105 धावा केल्या असताना अफगाणिस्ताननं हे आव्हान 10.1 ओव्हरमध्ये पार करत विजय नोंदवला आहे.



सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने गोलंदाजी निवडली. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी सुरु ठेवली. श्रीलंकेते फलंदाज अगदी स्वस्तात माघारी परतत होते. फजलक फारुखीने सुरुवातीपासूनच कमाल गोलंदाजी करत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. दरम्यान श्रीलंकेच्या गुणथलिका (17) आणि राजपक्षा (38) यांनी काहीशी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. त्याच्यानंतर करुणारत्ने याने 31 धावांची खेळी करत संघाला किमान 100 पार पोहोचवण्यात मदत केली. इतर खेळाडूंना साधी दुहेरी संख्याही गाठता आली नाही. ज्यामुळे 105 धावांवर श्रीलंकेचा संघ सर्वबाद झाला. यावेळी फजलक फारुखीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद नबी, मुजीबने प्रत्येकी 2 आणि नवीन उल् हकने एक विकेट घेतली.


अफगाणिस्तानचा सोपा विजय


106 धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अगदी एकहाती विजय संघाला मिळवून दिला. सलामीवीर हजरतुल्ला जजाईने 37, रहमनउल्लाह गुरबाजने 40 आणि इब्राहीम जद्रानने 15 नजिबउल्लाह जद्रानने दोन धावा करत संघाला आठ गडी राखून 10.1 ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला. श्रीलंकेकडून हसरंगाने एक विकेट घेतली असून इतर तिघेही धावचीत झाले.  


कसं आहे उर्वरीत ग्रुप स्टेजच्या सामन्यांचं वेळापत्रक 


28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग


कुठे होणार लाईव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग


आशिया कप 2022 मध्ये लाईव्ह ब्रॉडकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. त्यामुळे आशिया कप 2022 चं लाईव्ह ब्रॉडकास्ट स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेल्सवर विविध भाषांमध्ये पाहता येईल. याशिवाय लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार अॅपवर पाहू शकता. तसंच सर्व अपडेट्स एबीपी माझाच्या साईटवरही तुम्हाला मिळणार आहेत. 



हे देखील वाचा-