Virat Kohli, Asia Cup 2022 : भारतीय संघाचा हुकूमी एक्का विराट कोहली (Virat Kohli) आशिया चषक 2022 साठी संपूर्णपणे सज्ज झाला आहे. स्पर्धेत सर्वाधिक नजरा त्याच्यावर असल्याने त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे त्याचा खराब फॉर्म मागे टाकून त्याला दमदार खेळ करावा लागणार आहे. अशामध्ये विराटनं नेट्समध्ये कसून सराव सुरुच ठेवला असून त्याचे अनेक व्हिडीओही समोर येत आहेत. आता समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल  (Glen maxwell) याचा प्रसिद्ध स्विप शॉट खेळताना दिसत आहे. 


यूएईमध्ये आजपासून (27 ऑगस्ट) आशिया चषकाला सुरुवात होत आहे. आता उद्या म्हणजेच 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या महामुकाबल्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ सज्ज झाले असून विराटचा पाकिस्तानविरुद्धचा फॉर्म पाहता तो पुन्हा फॉर्ममध्ये येईल अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. त्यामुळे विराटची कामगिरी कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर या सामन्यापूर्वी सध्या विराटचा व्हायरल होत असलेला मॅक्सवेल शॉटचा व्हिडीओ पाहूया...


पाहा VIDEO






कोहलीची खराब फॉर्मशी झुंज


विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. आशिया चषकात विराट कोहली चांगली कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा आहे. 


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द


विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.


हे देखील वाचा-


Asia Cup 2022 : आशिया कपमध्ये पाकिस्तानवर कायमच भारत वरचढ, 1984 ते 2018 पर्यंतच्या सामन्याचे निकाल एका क्लिकवर


IND vs PAK : यंदा आशिया चषकात 1, 2 नाही तर 3 वेळा भारत-पाकिस्तान सामना रंगण्याची शक्यता, वाचा सविस्तर