Hong Kong Team Dance : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेसाठी यंदा पुन्हा एकदा हाँगकाँग संघ (Team Hong Kong) पात्र ठरला आहे. त्यामुळे भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यासोबत आता हाँगकाँगचे खेळाडूही आशिया कप मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पात्रता फेरीतील सर्व सामने जिंकत आशिया कपसाठी त्यांनी पात्रता मिळवली. दरम्यान यानंतर कमालीचे आनंदी झालेले हाँगकाँगचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये धिंगाणा करताना दिसले. बॉलीवुडमधील काला चष्मा गाण्यावर सगळेजण थिरकत असून विशेष म्हणजे याच गाण्यावर असाच डान्स टीम इंडियाने काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वे संघाला मात दिल्यानंतर केला होता. अगदी तसाच डान्स हाँगकाँग संघाने केल्याने त्यांचा व्हिडीओही तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ-
काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वेला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Zimbabwe) पराभूत करत भारताने मालिका नावावर केली होती. विशेष म्हणजे भारताने झिम्बाब्वेला 3-0 च्या फरकाने मात देत व्हाईट वॉश दिला आहे. या विजयामुळे भारताने झिम्बाब्वेला क्लिन स्वीप दिल्यामुळे विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये अगदी आनंदी वातावरण होतं. सर्व खेळाडू तुफान असा जल्लोष करताना दिसत होते. शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्यावेळी शेअर केलेल्या व्हिडीओमधील डान्सप्रमाणेच डान्स हाँगकाँगने केला असून भारताचा डान्सही पाहूया...
हाँगकाँगने कशी मिळवली पात्रता?
पात्रता फेरीत अत्यंत अप्रतिम कामगिरी करत हाँगकाँगच्या संघाने ग्रुप स्टेजमध्ये जागा मिळवली आहे. त्यांनी पात्रता फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. हाँगकाँगने सिंगापुरसह कुवेत आणि यूएई संघाला ही मात दिली. त्यामुळे पात्रता फेरीच्या गुणतालिकेत हाँगकाँगने अव्वल स्थान कायम ठेवत पात्रता मिळवली. कुवेतचा संघ चार गुणांसह दुसऱ्या तर यूएईचा संघ एक सामना जिंकून तिसऱ्या स्थानावर असून सिंगापुरचा संघ एकही सामना न जिंकल्यामुळे चौथ्या स्थानी राहिला.
कसं आहे वेळापत्रक?
आशिया कप 2022 साठी भारत पाकिस्तान हे संघ एकाच गटात असून हाँगकाँग संघानेही यामध्ये पात्रता मिळवली आहे. त्यानंतर दुसऱ्या गटात अर्थात ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर नेमकी स्पर्धा कशी खेळवली जाईल पाहूया...
ग्रुप स्टेजचे सामने
27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग
ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
हे देखील वाचा-