Asia Cup Hockey 2022: भारताला हिशोब चुकता करण्याची संधी, साखळी सामन्यात झाला होता जपानकडून पराभव
India vs Japan Asia Cup Hockey 2022 : हॉकी आशिया कप स्पर्धेत आज पुन्हा एकदा भारत आणि जपान यांची लढत होणार आहे.
India vs Japan Asia Cup Hockey 2022 : हॉकी आशिया कप स्पर्धेत आज पुन्हा एकदा भारत आणि जपान यांची लढत होणार आहे. विजेता संघ फायनलमध्ये पोहचणार आहे. सुपर 4 च्या या लढतीत भारताला जपानबरोबरचा हिशोब चुकता करण्याची संधी आहे. जपाने साखळी फेरीत भारताचा 5-2 च्या फरकाने पराभव केला होता. हाच हिशोब चुकता करण्याची भारताकडे संधी आहे. जपानचा हिशोब चुकता करण्यासाठी भारतीय संघाला आपला खेळ उंचावावा लागेल... पुन्हा एकदा सांघिक खेळी करावी लागणार आहे. साखळी फेरीत जपानविरोधात झालेल्या चुका भारतीय संघाला सुधाराव्या लागतील.तसेच नव्या रननितीने मैदानात उतरावे लागणार आहे.
आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत पेनल्टी कॉर्नरवर अधिक गोल करण्यात भारतीय संघाला अपयश आलेय. भारतीय संघासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण भारतीय संघाकडे रूपिंदरपाल सिंह आणि अमित रोहिदास यासारखे ड्रॅगफ्लिकर नाहीत. भारतीय संघाला इंडोनिशियासारख्या कमकुवात संघासोबत 20 पेक्षा अधिक पेनल्टी कॉर्नरपैकी अर्ध्याला गोलमध्ये बदलता आले नाही. भारतीय संघाने यंदा युवा संघ उतरवण्याचा निर्णय घेतलाय. चमूतील तब्बल दहा खेळाडू नवखे आहेत. या दहा खेळाडूंनी आतापर्यंत कधीही सिनिअर भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. युवा खेळाडूंना अनुभव यावा, यासाठी हा निर्णय घेतला.
भारतीय संघीच साखळी फेरीतील कामगिरी -
हॉकी आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने सलामीचा सामना बरोबरीत सोडला.. पाकिस्तान आणि भारतामध्ये अटीतटीची लढत झाली. हा सामना अनिर्णत राहिला. पण दुसऱ्या सामन्यात जपानने भारताचा पराभव केला. जपानकडून पराभव झाल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान खडतर झाले होते. पण भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. मोक्याच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावली. भारताने इंडोनेशियाचा 16-0 च्या फरकाने दारुण पराभव करत सुपर 4 फेरी गाठली आहे. पण आता मात्र भारतासमोर जपानचं आव्हान आहे. भारतीय संघ हिशोब चुकता करणार की जपान पुन्हा बाजी मारणार? हे लवकरच समजेल.
दोन गटात स्पर्धा -
हॉकी आशिया कप स्पर्धेत दोन गट करण्यात आले होते. अ गटामध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान इंडोनेशिया संघ होता. तर ब गटामध्ये मलेशिया, दक्षिण कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ होते. सुपर 4 मध्ये जपान, भारत,दक्षिण कोरिया आणि मलयेशियाने एन्ट्री केली आहे. या चार संघातील दोन संघामध्ये फायनल होणार आहे.
दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने सुरुवातीपासून एका गोलची आघाडी कायम ठेवली होती. पण अखेरच्या काही मिनिटांत पाककडून गोल करण्यात आल्याने सामना अनिर्णीत ठरला. तर दुसऱ्या सामन्यात मात्र जपानने सुरुवातीपासून आपला दबदबा ठेवला होता. भारताने महत्त्वपूर्ण दोन गोल केले पण तोवर जपानने आघाडी वाढवल्याने अखेर भारत 5-2 ने पराभूत झाला. त्यानंतर आज भारताने 16-0 च्या मोठ्या फरकाने विजय मिळवत पुढील फेरी गाठली आहे. तर जपानने भारत आणि पाकिस्तानला मात देत पुढील फेरी गाठली आहे. दरम्यान आता जपान आणि भारत आमने-सामने असतील.