एक्स्प्लोर

''अश्विन, जाडेजाने पुनरागमनाची आशा सोडू नये''

2019 चा विश्वचषक पाहता कर्णधार विराट कोहलीही चहल आणि कुलदीपलाच जास्तीत जास्त संधी देत आहे.

जोहान्सबर्ग : टीम इंडियाची फिरकीपटू जोडी कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी संघात आपलं स्थान पक्क केलं आहे. त्यामुळेच फिरकीपटू जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांचा पर्याय म्हणून या दोघांना संघात स्थान देण्यात येत आहे. 2019 चा विश्वचषक पाहता कर्णधार विराट कोहलीही चहल आणि कुलदीपलाच जास्तीत जास्त संधी देत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता अश्विन आणि जाडेजासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या वक्तव्यानंतर अश्विन आणि जाडेजाला काहीसा दिलासा मिळू शकतो. या दोघांसाठी विश्वचषकाच्या भारतीय संघाचे दरवाजे अजूनही खुले आहेत, असं भरत अरुण यांनी म्हटलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात येणाऱ्या चौथ्या वन डेपूर्वी भरत अरुण बोलत होते. खेळपट्टीच्या परिस्थितीवर अवलंबून न राहता कुलदीप आणि चहल गोलंदाजी करतात, असं भरत अरुण म्हणाले. ''कुलदीप आणि चहल सकारात्मक गोलंदाज आहेत. ते चेंडू फ्लाईट करण्यासाठी कधीही घाबरत नाहीत. शिवाय काहीतरी मिळवण्यासाठी चेंडू जास्त स्पिन करायलाही चाचपडत नाहीत आणि खेळपट्टीच्या परिस्थितीवर जास्त अवलंबून न राहता गोलंदाजी करतात,'' असं भरत अरुण यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत भारत सध्या 3-0 ने आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या तीनही सामन्यांमध्ये या फिरकीपटू जोडीने शानदार कामगिरी केली आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर कुलदीप यादव आणि चहलने आतापर्यंत 17 सामन्यांमध्ये 32 विकेट घेतल्या आहेत. या शानदार कामगिरीनंतरही विश्वचषकाच्या संघात अजून जागा बाकी असल्याचं गोलंदाजी प्रशिक्षकांचं म्हणणं आहे. ''भारताकडे गोलंदाजांची चांगली फळी आहे. त्यामुळे प्रत्येक फॉरमॅटमध्ये रोटेशन पॉलिसीचा वापर केला जात आहे. अश्विन आणि जाडेजा वन डे संघात सहभागी होण्याच्या शर्यतीत नाहीत, असं नाही. ते अजूनही भारतीय संघात जागा मिळवू शकतात,'' असं भरत अरुण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Embed widget