एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाला धक्का, महत्त्वाचा खेळाडू उर्वरित सामन्यांमधून आऊट
बोटाला झालेल्या दुखापतीमुळे अॅस्टन अॅगर उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

इंदूर : टीम इंडियाविरुद्धच्या वन डे मालिकेत पराभवाचा सामना करत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इंदूर वन डेत क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झालेला अॅश्टन अॅगर उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे अॅश्टन अॅगर उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियात जाऊन तो उपचार घेणार आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया संघाचे डॉक्टर रिचर्ज सॉ यांनी दिली. अॅश्टन अॅगर हा ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या गोलंदाजांपैकी एक आहे. भारताविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मालिका गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का असेल. कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंदूरच्या तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक























