एक्स्प्लोर
माझी खेळी घमेंडी कोहलीला चोख उत्तर होतं : सिमन्स
मुंबई : घमेंडी विराट कोहलीने मला ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये मॅचविनिंग खेळीसाठी डिवचलं, असा खुलासा वेस्ट इंडिजचा फलंदाज लेंडल सिमन्सने केला आहे.
सिमन्सने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात 51 चेंडूत 82 धावांची खेळी रचून, कॅरेबियन संघाला बिकट परिस्थितीतून विजयपथावर नेलं. पहिल्यांदा खेळताना भारताने 20 षटकात 192 धावा केल्या होत्या. कोहलीने 47 चेंडूत 89 धावा ठोकल्या होत्या. मात्र सिमन्सच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने हा सामना 7 विकेट्स जिंकला होता.
कोहलीने डिवचलं
ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सिमन्सने सांगितलं की, "क्षेत्ररक्षण करताना विराट मला काहीतरी बोलला होता. त्यावेळी मी मनाशी निर्धार केला की, विराटला दाखवून द्यायचं की तोच एकमेव चांगला फलंदाज नाही."
'कोहली आक्रमक व्यक्ती आहे'
लेंडल म्हणाला की, "कोहली असाच आहे. तो प्रचंड घमेंडी आहे. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना तो आक्रमक असतो. तो अतिशय आक्रमक व्यक्ती आहे."
जीवदानाचा फायदा उचचला
खरंतर उपांत्य सामन्यात लिंडेल सिमन्सला दोन जीवदान मिळाले. याबाबत तो म्हणाला की, "प्रत्येक क्रिकेटरचा एक दिवस असतो. फक्त त्याला त्याचा फायदा घेता आला पाहिजे. मला मिळालेल्या जीवदानाचा मी फायदा उचलला आणि शेवटपर्यंत फलंदाजी केली."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement