एक्स्प्लोर
Advertisement
ब्रिटनचा टेनिसपटू अॅन्डी मरे टेनिसचा 'बादशाह'?
पॅरिस: ब्रिटनचा टेनिसपटू अॅन्डी मरेने व्यवसायिक टेनिस संघाच्या (Association of Tennis Professionals एटीपी) रँकिंगमध्ये जवळपास अव्वल स्थान निश्चित झाले असून, पॅरिस मास्टर्सच्या सेमीफायनलमधून मरेचा प्रतिस्पर्धी कॅनेडाच्या मिलॉस राओनिकाने शनिवारी माघार घेतल्यामुळे मरेने थेट फायनल सामन्यात धडक मारली. आता फायनलमध्ये त्याची गाठ अमेरिकेच्या जॉन इश्नेरशी पडणार आहे.
या टूर्नामेंटच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, राओनिकने आपल्या डाव्या पायाच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतल्याने मरेने अंतिम सामन्यात धडक मारली.
गेल्या 122 आठवड्यापासून एटीपी रँकिंगमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचने अव्वल स्थान कायम राखले होते. पण आता पहिल्यांदा या रँकिंगमध्ये मरेला अव्वल स्थान गाठण्याची संधी मिळणार आहे.
सोमवारी जेव्हा एटीपीची नवी रँकिंग जाहीर होईल, तेव्हा नोवाकला खाली खेचून मरे अव्वल स्थान गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या टूर्नामेंटच्या क्वार्टर फायनलमध्ये जोकोविचला क्रोएशियाच्या मारिन सिलिककडून पराभवाचा सामना करावा लागल्याने, तो या टूर्नामेंटमधून या आधीच बाहेर झाला आहे. त्यामुळे जोकोविचच्या पराभवाचा मरेला फायदा होत आहे. मरेला फायनलमध्ये अमेरिकेच्या जॉन इश्नेरचा सामना करावा लागणार आहे. इश्नेरने शनिवारी झालेल्या सामन्यात सिलिकचा पराभव करुन फायनलमध्ये धडक मारली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement