एक्स्प्लोर
हाशिम अमलानं तोडला कोहलीचा विक्रम!
सेंट किट्स: दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हशिम अमलानं भारताच्या विराट कोहलीचा आणखी एक विक्रम मोडीत काढला. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 23 शतकं ठोकण्याचा मान हा आता अमलाच्या नावावर जमा झाला आहे.
अमलानं तिरंगी मालिकेतल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 99 चेंडूंत 13 चौकारांसह 110 धावांची खेळी उभारली. त्याचं हे वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं 23वं शतक ठरलं. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमलाचं 23वं शतक अवघ्या 132व्या डावात साजरं झालं.
विराट कोहलीनं वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं आपलं 23वं शतक 157व्या डावात झळकावलं होतं. दरम्यान, सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कवरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी दिलेलं 344 धावांचं आव्हान विंडीजला पेलवलं नाही. त्यांचा अख्खा डाव 38 षटकांत 204 धावांत गडगडला. त्याआधी, हशिम अमलाच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 50 षटकांत चार बाद 343 धावांची मजल मारली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement