Asia Boxing Championship : अमित पंघालची आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
Asia Boxing Championship : गतविजेत्या अमित पंघालनं (Amit Panghal) (52 किलो) कझाकस्तानच्या साकन बिबोसिनोववर मात करत आज शुक्रवारी येथे आशियाई बॉक्सिंग चँपियनशिपच्या (Asia Boxing Championship : ) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Asia Boxing Championship : गतविजेत्या अमित पंघालनं (Amit Panghal) (52 किलो) कझाकस्तानच्या साकन बिबोसिनोववर मात करत आज शुक्रवारी येथे आशियाई बॉक्सिंग चँपियनशिपच्या (Asia Boxing Championship : ) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंघल सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अव्वल मानांकित अमित पंघालनं बिबोसिनोवचा 5-0 असा पराभव केला. कझाकस्तानचा बिबोसिनोव हा जागतिक स्पर्धेत कांस्यपदकाचा मानकरी ठरला आहे. पंघलनं 2019 विश्व चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये देखील साकेनला हरवलं होतं.
𝐀𝐌𝐀𝐙𝐈𝐍𝐆 𝐀𝐌𝐈𝐓 🔥
— Boxing Federation (@BFI_official) May 28, 2021
Defending champion @Boxerpanghal shows his masterclass to enter the Finals of the 2021 ASBC Asian Elite Boxing Championships in Dubai 🥊 He defeated 🇰🇿's Saken Bibossinov 5️⃣-0️⃣#PunchMeinHaiDum#AsianEliteBoxingChampionships#GoForGold pic.twitter.com/HjzEzVGbVR
तिसऱ्या मानांकित बिबोसिनोवने खेळात लवकर आक्रमकता दाखवली. मात्र पंघलनं चतुराईनं खेळत त्याला वरचढ होऊच दिलं नाही. त्याला अखेर 5-0 नं हरवत पंघालनं फाय़नलचं तिकीट मिळवलं. फायनलमध्ये त्याचा सामना मंगोलियाच्या ओरखोनटुंगालाग उनूबोल्ड सोबत होणार आहे. त्याने सेमीफायनलमध्ये उजबेकिस्तानच्या मिजार्खेदोव नोदीरजोनला पराभूत केलं आहे.
आजच्या विजयासह पंघालनं आपल्यासाठी किमान रजतपदक निश्चित केलं आहे.