एक्स्प्लोर
हार्दिक पंड्या टीम इंडियाची दौलत : लान्स क्लुजनर
पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 93 धावा केल्या. इतकंच नाही तर आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात 27 धावांत 2 विकेटही घेतल्या.

केपटाऊन: अष्टपैलू हार्दिक पंड्या हा भारतासाठी एखाद्या संपत्तीसारखा मौल्यवान आहे, अशी स्तुतीसुमनं दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटर लान्स क्लुजनरने उधळली आहेत. पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 93 धावा केल्या. इतकंच नाही तर आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात 27 धावांत 2 विकेटही घेतल्या. पंड्याच्या या कामगिरीचं क्लुजनरने कौतुक केलं. “पहिल्या डावात पंड्याची फलंदाजी जबरदस्त होती. त्याने भारताला दबावातून बाहेर काढलंच, शिवाय आफ्रिकेला दबावात टाकलं. सध्या तर तो शिकतोय. त्याच्या गोलंदाजीला आणखी धार चढेल, तेव्हा तो उत्तम अष्टपैलू होईल”, असं क्लुजनर म्हणाला. अल्पावधितच हार्दिक पंड्या टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. वन डे, टी ट्वेण्टी किंवा कसोटी या तीनही फॉरमॅटमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. “पंड्या सर्वोत्तम अष्टपैलू बन शकतो. त्याला करिअरमध्ये अपयशही येऊ शकतं, मात्र त्याने खचून न जाता सकारात्मक पावलं टाकत, मेहनत करत राहावी. पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळो किंवा भारतीय संघातून, त्याच्या अवती-भोवती दिग्गजांचा सहवास लाभतो. त्याच्यातील टॅलेण्ट शोधणं हे त्यांचं काम आहे”, असं क्लुजनरने नमूद केलं. आफ्रिकेतील खेळपट्ट्यांचा अंदाज घेण्यासाठी भारताने एकतरी सराव सामना खेळायला हवा होता, असंही क्लुजनर म्हणाला. आता पहिल्या सामन्यातील पराभवातून भारताने धडा घ्यावा, तो घेईल. पहिल्या सामन्यात पंड्याने धावा केल्या नसत्या, तर भारताची अवस्था आणखी बिकट झाली असती. त्यामुळे भारताने वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यासाठी तयार राहावं, असा सल्ला क्लुजनरने दिला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























