एक्स्प्लोर

भारतासोबतच्या पराभवानंतर कूक कर्णधारपदावरुन पायउतार

लंडन : इंग्लंडच्या अलिस्टर कूकने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कूकने 2012 साली इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा स्वीकारली होती. त्याच्याच नेतृत्त्वाखाली इंग्लंडनं 2013 आणि 2015 साली अॅशेस मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. मात्र गेल्या वर्षी भारतातील कसोटी मालिकेत 0-4 असा पराभव स्वीकारावा लागल्यावर कूकने कर्णधारपदाविषयी पुनर्विचार करत असल्याचं कबूल केलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचं नेतृत्त्व करणं हा माझा बहुमान समजतो. पण संघाचं हीत पाहता आणि माझ्या कारकीर्दीच्या दृष्टीनेही मी या जबाबदारीतून मोकळं होणं योग्य ठरेल, असं कूकनं म्हटलं आहे. कूकची कर्णधार म्हणून कारकीर्द अॅलेस्टर कूकनं इंग्लंडसाठी सर्वाधिक 59 कसोटी सामन्यांत नेतृत्त्वाची जबाबदारी पेलली होती. त्यात इंग्लंडने 24 वेळा विजय साजरा केला आणि 22 सामने गमावले होते तर 13 कसोटी अनिर्णित राहिल्या. कूकने 69 वन डे आणि एका ट्वेन्टी 20 सामन्यातही इंग्लंडचं नेतृत्त्व केलं होतं. कूकनंतर कुणाला संधी? इंग्लंडच्या वन डे आणि ट्वेन्टी 20 संघांची धुरा सध्या इयॉन मॉर्गनकडे आहे. आता कूकच्या राजीनाम्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी ज्यो रूटवर सोपवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला, तरी कूक फलंदाज म्हणून इंग्लंडसाठी आणखी काही काळ खेळत राहणार आहे. 32 वर्षीय कूकने  140 कसोटींमध्ये 46.45 च्या सरासरीने 11 हजार 57 धावा केल्या असून, त्याच्या खात्यात कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतकं जमा आहेत. ” इंग्लंडचा मधल्या फळीतील हुकमी फलंदाज ज्यो रुट कर्णधारपद सांभाळण्यासाठी तयार आहे. भारताकडून झालेल्या पराभवामुळे माझ्या कर्णधारपदाबाबत प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. मात्र मी पुढील वर्षापर्यंत माझ्या भविष्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही”, असं कूकने भारतातील पराभवानंतर स्पष्ट केलं होतं.

संबंधित बातमी : जो रुट इंग्लंडचं कर्णधारपद भूषवण्यास सक्षम : अॅलिस्टर कूक

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
IND vs WI 5th T20I Playing-11 : वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Vaibhav Sooryavanshi : रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget