एक्स्प्लोर

Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं

Pune Crime News: वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजय कुमार भाटिया आणि अजून एका व्यक्तीविरोधात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्यामुळे मानसिक त्रास (Pune Crime News) सहन करणाऱ्या 22 वर्षीय आयटी इंजिनियरने इमारतीच्या 27व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खराडी परिसरात उघडकीस आला आहे. (Pune Crime News) शिखर कुमार गौरव सक्सेना असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजय कुमार भाटिया  आणि अजून एका व्यक्तीविरोधात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime News)

Pune Crime News:  नेमकं काय घडलं? 

30 सप्टेंबरला शिखर लॅपटॉप मोबाईल आणि बाकी सगळे इलेक्ट्रिक गॅजेट्स पीजीवर ठेवून गायब झाला. त्यावेळी त्यांनी त्याचा मोबाईल नंबर आईच्या मोबाईलवर ट्रान्सफर करून ठेवला होता. शिखरला येणारे सगळे फोन त्याच्या आईला गेले त्यात या आरोपीचा देखील फोन आईला गेला. तुमचा मुलगा ड्रग्स विकतो किंवा ड्रग्स काम करतो शिवाय मुलीं संदर्भात देखील वाईट वर्तणूक करतो असं त्याच्या आईला या फोनवरून सांगण्यात आलं आणि मी पोलीस बोलतोय असं देखील सांगण्यात आलं. हे सगळं बघून वडिलांना संशय आला. शिखर गायब झाल्यानंतर  त्याच्या मामाने खराडी पोलीस ठाण्यात दाखल मिसिंगची तक्रार दाखल केली होती. 

 दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच एक ऑक्टोबरला शिखरणे खराडी परिसरातील रिव्हर डेल सुट या सोसायटीतील 27व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी सुरुवातीला मृत्यूची नोंद केली. त्याच्या आई वडील पुण्यात दाखल झाले आणि त्यांनी शिखरच्या मोबाईलवर अशा प्रकारचे फोन येत असल्याचे आणि मेसेज येत असल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. आरोपी पोलीस असल्याचे सांगून शिखरला ड्रुगच्या गुन्ह्यात आणि मुलीं संदर्भातल्या गुन्ह्यात अडकवतो अशा धमक्या देत होता. याच सगळ्या धमक्यांना कंटाळून शिखरने सत्ताविसाव्या मजल्यावरून उडी मारून स्वतःला संपवल्याचं समोर आलं. संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या खराडी पोलीस करत आहेत.

Pune Crime News:  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...

या प्रकरणात शिखरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींनी पोलीस असल्याचे भासवून शिखरला ड्रग्स आणि मुलींशी संबंधित कथित गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमक्यांद्वारे त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात येत होती का, तसेच या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. अवघ्या 22 वर्षांच्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणातील आरोपींची भूमिका आणि शिखरवर नेमका किती मानसिक दबाव होता, याचा उलगडा तपासातून होण्याची शक्यता आहे. खराडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर कुमार हा पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता. खराडी परिसरातील रिव्हरडेल सूट या सोसायटीतून त्याने 27 व्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्याच्या मृत्यूमागील कारणांबाबत वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. शिखर कुमार हा 29 सप्टेंबर रोजी घरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या बेपत्ता होण्याबाबत खराडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, शिखरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचे वडील कुमार गौरव सक्सेना (वय 46, रा. हरिद्वार, उत्तराखंड) यांनी पुण्यात येऊन पोलिसात तक्रार दिली. अजय कुमार भाटिया नामक व्यक्ती शिखरला वारंवार फोन करत होती. ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जात होती. तसेच, या प्रकारामुळे शिखरला मानसिक त्रासातून जात होता असे त्याच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून शिखरने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. खराडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Vaijapur Rohit Pathare Case : वैजापूरमध्ये रोहित पठारेला निर्घृणपणे संपवलं, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न; आरोपींना कोर्टात नेताना मोठा गोंधळ
वैजापूरमध्ये रोहित पठारेला निर्घृणपणे संपवलं, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न; आरोपींना कोर्टात नेताना मोठा गोंधळ
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
Sonia Gandhi Journey of Love: माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
Embed widget