एक्स्प्लोर

Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!

Malegaon Dongrale Case Verdict : संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षीय लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे.

Malegaon Dongrale Case Verdict : संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या मालेगाव (Malegaon Crime) तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षीय लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. 16 नोव्हेंबर 2025 ला साडेचार वर्षीय चिमुरडीवर 21 वर्षीय विजय खैरनार या नराधमाने लैंगिक (Crime News) अत्याचार करत तिचा गळा आवळून अमानुषपणे खून केला होता. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अखरे आज ( दि.16 ऑक्टोबर ) तब्बल दहा महिन्यानंतर मालेगावच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने (Additional District and Sessions Court) निकाल देत अखेर विजय खैरनार या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणी पीडित कुटुंबाला न्याय देत कोर्टानं आज निकाल दिला आहे. (Malegaon Crime News)

Malegaon Crime News : दुर्मिळतील दुर्मिळ घटना असल्याचे निरीक्षण, पीडितेच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये देण्याचे आदेश

दरम्यान, जिल्हा व अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.जी.पालदेवार यांनी या संदर्भात निकाल देत शिक्षा सुनावली आहे. दुर्मिळतील दुर्मिळ घटना असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तर पीडितेच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये देण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहे. तर आरोपी विजय खैरनार व त्याचे वकील व्हिडिओ कॉन्फरनसिंग द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. निकालावेळी पीडितेचे कुटुंबीय, मंत्री दादा भुसे यांच्यासह सामाजिक, राजकीय संघटना पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील कोर्टाच्या परिसरात उपस्थित होते. तर पीडितेकडून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांच्यासह ॲड. स्नेहा शर्मा ठाकरे, ॲड. संजय सोनवणे यांनी काम बघितल्याची माहिती आहे. तर आरोपीकडून ॲड.राठी यांनी कामकाज बघितले. आता आरोपीला उच्च न्यायालयात 30 दिवसांच्या आत दाद मागता येऊ शकते, अशी देखील माहिती आहे.

Malegaon Dongrale Case : नेमकं प्रकरण काय?

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 16 नोव्हेंबर 2025 ला साडेचार वर्षीय चिमुरडीवर 21 वर्षीय विजय खैरनार या नराधमाने लैंगिक अत्याचार करत तिचा गळा आवळून अमानुषपणे खून केला होता. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आज ( दि.16 ऑक्टोबर ) तब्बल दहा महिन्यानंतर या घटनेचा मा.अपर जिल्हा व सत्र न्यायालय, मालेगाव येथे पोक्सो जलदगती न्यायालयात न्याय निर्णय देण्यात आला आहे. अतिशय घृणास्पद व निंदनीय कृत्य करणाऱ्या विजय खैरनार या नराधमाला आज मा.न्यायालय जन्मठेपेची शिक्षा सुनावणार की फाशी ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. अखेर न्यायालयने या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. मालेगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सुरुवातीस 23 दिवसांत 425 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात आतापर्यंत पोलीस, ग्रामस्थ, पिडीताचे कुटुंब, वैद्यकीय अधिकारी आदीं 24 साक्षीदार तपासण्यात आलेले असून शासन नियुक्त विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी भक्कम पुराव्याच्या आधारे मा.न्यायालयात मांडणी केली आहे.

दरम्यान, मागील सुनावणीत आरोपी विजय खैरनार याचेवर दोष निश्चिती करण्यात आलेली असून न्यायालयाने त्याचे म्हणणे मांडण्याची देखील संधी त्याला उपलब्ध करून दिली होती. तसेच पोलीस, मानसोपचार तज्ञ व जेलर यांचेकडून त्याचे वर्तणुकीबाबत अहवाल कोर्टात सादर करण्यात आले होते.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget