(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Naveen-ul-Haq : थेट विराटला भिडला अन् चर्चेत आला; आता अवघ्या वयाच्या चोविशीत नाविन उल हकचा धक्कादायक निर्णय! अफगाणिस्तानमध्ये सन्नाटा पसरला
नवीनने निवृत्तीची पुष्टी केली आहे. 'मैं रहूं या न रहूं' या गाण्यासोबत त्याने त्याची काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. यासोबत त्याने 'थँक यू' लिहिले आणि अफगाणिस्तानच्या ध्वजाची इमोजीही जोडली.
Naveen-ul-Haq : अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नाविन उल हकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वर्ल्ड कप 2023 मधील अफगाणिस्तानचा प्रवास संपताच त्याने ही माहिती दिली. तसे, त्याने विश्वचषकापूर्वीच याची घोषणा केली होती. 27 सप्टेंबर रोजी त्याने विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते.
Afghanistan pacer Naveen Ul Haq retires from ODI cricket at the age of only 24 🇦🇫👀 #CWC23 #SAvsAFG pic.twitter.com/JGVlBAQWNS
— Farid Khan (@_FaridKhan) November 10, 2023
नाविनने शुक्रवारी (10 नोव्हेंबर) इन्स्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची पुष्टी केली. 'मैं रहूं या न रहूं' या गाण्यासोबत त्याने त्याची काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. यासोबत त्याने 'थँक यू' लिहिले आणि अफगाणिस्तानच्या ध्वजाची इमोजीही जोडली. या पोस्टनंतर नवीन यापुढे एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या जर्सीमध्ये दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
"I had a chat with Virat bhai that day and he revealed which ball is planted by BCCI for more swing. We picked that one today from box." - Naveen ul Haq pic.twitter.com/aYvrYutyJR
— Silly Point (@FarziCricketer) November 7, 2023
यानंतर नाविनने एक इन्स्टा स्टोरीही शेअर केली आहे. येथे त्याने लिहिलं की, 'मी पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत ही जर्सी मोठ्या अभिमानाने घातली आहे. शुभेच्छा पाठवल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
नाविनला आता फक्त टी-20क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. तो अफगाणिस्तानकडून टी-20 आंतरराष्ट्रीय खेळत राहणार आहे. सप्टेंबरमध्ये त्यानं भविष्यातील योजनांची सविस्तर माहिती दिली होती. तो म्हणाला होता की, त्याला आपली कारकीर्द लांबवायची आहे, म्हणून त्याला इतर फॉरमॅट सोडून फक्त टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
नवीन 24 वर्षांचा आहे, त्याने अफगाणिस्तानसाठी 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत नवीन अवघ्या 24 वर्षांचा आहे. त्याने अफगाणिस्तानसाठी 15 एकदिवसीय सामने खेळले. या कालावधीत त्याने 6.15 च्या इकॉनॉमीसह 32.18 च्या सरासरीने 22 विकेट्स घेतल्या. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नवीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6.3 षटके टाकली पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.
आयपीएलमध्ये विराटशी झाला होता वाद
आयपीएलमध्ये किंग विराट कोहलीशी वाद झाल्यानंतर नाविन चर्चेत आला होता. दोघांच्या वादाचा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर भारतात होत असलेल्या वर्ल्डकपमध्ये नवीनने विराटला भेटून वादावर पडदा टाकला होता. विराटच्या देहबोलीवरून तो सुद्धा विसरून गेल्याचे दिसून आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या