एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाक फलंदाजांचा बिनडोकपणा, चौकाराच्या अविर्भावात असताना धावचीत
झालं असं की, अजहर अलीने ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पीटर सिडलने टाकलेला चेंडू ऑफ साईडला टोलवला. चेंडू सीमेजवळ गेला, पण चेंडू सीमापार गेला, असं समजून असद शफीक आणि अजहर अली हे दोघे पिचवर गप्पा मारत उभे होते.
अबुधाबी : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अबुधाबीमधील कसोटी सामन्यात असा धावचीत पाहायला मिळाला, ज्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात बिनडोक रनआऊट असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावाच्या 53 व्या षटकात फलंदाज अजहर अली अतिशय विचित्र पद्धतीने बाद झाला. एखादा फलंदाज अशापद्धतीने बाद होईल, यावर कोणालाही विश्वास बसणार नाही.
झालं असं की, अजहर अलीने ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पीटर सिडलने टाकलेला चेंडू ऑफ साईडला टोलवला. चेंडू सीमेजवळ गेला, पण चेंडू सीमापार गेला, असं समजून असद शफीक आणि अजहर अली हे दोघे पिचवर गप्पा मारत उभे होते.
इथेच दोघांकडून चूक घडली आणि मिचेल स्टार्कने सीमेजवळ चेंडू पकडून वीकेटकीपर टीम पेनकडे थ्रो केला. टीम पेनने कोणतीही चूक न करता थ्रो पकडून चेंडू स्टम्पवर लावला, ज्यामुळे अजहर अली धावचीत झाला.
अजहर अली बाद होण्याची पद्धत अतिशय बालिश होती. चेंडू न पाहताच चौकार समजून अजहर अली नॉन स्ट्राईकवर असलेल्या शफीकसोबत बोलण्यासाठी पिचच्या मध्ये येऊन उभा राहिला. दोन्ही फलंदाज बोलण्यात मश्गूल असताना, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेला आणि सीमेच्या काही अंतर आत थांबला. स्टार्कने त्याच्या चुकीचा फायदा उठवत चेंडू टीम पेनकडे फेकला आणि पेनने वेळ न दवडता यष्टी उडवल्या. हे पाहून अजहर अली आश्चर्यचकित झाला आणि नेमकं काय घडलं हे त्यालाही समजलं नाही. अजहर 64 धावा करुन माघारी परतला.Unbelievable. 😳 Azhar Ali run out whilst chatting with Shafiq in the middle, thinking he's hit a four. Except he didn't. Dumb and dumber. Easily the stupidest piece of cricket I've ever seen in 35 years of watching and playing cricket. Pakistan bloody Zindabad.#PAKvsAUS pic.twitter.com/nhFgRoq2aw
— Abu Eesa Niamatullah (@Niamatullah) October 18, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement