एक्स्प्लोर
ब्रेबॉनवर धोनीचा शेवटचा सामना, चाहता पाया पडण्यासाठी खेळपट्टीवर
मुंबई : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरील भारत 'अ' आणि इंग्लंड संघांमधली सराव सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी उसळली. या सामन्यादरम्यान धोनीच्या एका चाहत्यानं स्टेडियमवर धाव घेत खेळपट्टी गाठली आणि त्याचा पाया पडला. या चाहत्याला लगेच मैदानाबाहेर काढण्यात आलं.
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटरसिकांनी मोठी गर्दी केली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात भारत 'अ' संघाचं नेतृत्त्व करतो आहे. एका आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनीचा हा अखेरचा सामना आहे. त्यामुळं या सराव सामन्याला दहा हजारांहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली आहे. महत्वाचं म्हणजे आजचा हा सराव सामना सर्वांसाठी विनामूल्य़ ठेवण्यात आला आहे.
ब्रेबॉर्नवर विनामूल्य प्रवेशाचा मुंबईकरांनी लाभ घेतला आहे. धोनी स्टेडियममध्ये उतरताच चाहत्यांनी धोनीच्या नावाचा एकच गजर केला. तसंच धोनीचे चाहते स्टेडियममध्ये अधूनमधून धोनी धोनी नावाचा पुकार करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement