एक्स्प्लोर

रैनाच्या षटकारामुळे स्टेडियममधला 6 वर्षांचा चिमुरडा जखमी

बंगळुरु : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला 75 धावांनी लोळवलं. तुफान फटकेबाजी करणाऱ्या सुरेश रैनाने ठोकलेल्या एका षटकारामुळे चिमुरडा जखमी झाला. सुदैवाने चिमुरड्याला गंभीर दुखापत झाली नाही. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी हा सामना रंगला. सुरेश रैनाने लगावलेला सिक्सर स्टेडियममध्ये बसलेल्या 6 वर्षांच्या सतीशच्या डाव्या मांडीवर लागला. त्याला तातडीने स्टेडियममधल्या कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं. प्राथमिक वैद्यकीय उपचार केल्यानंतर सतीश उर्वरित सामना पाहण्यासाठी परतही आला. 'त्याला हलकीशी दुखापत झाली होती. दहा मिनिटांनी त्याने उर्वरित सामना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आम्हाला त्याला परवानगी देण्याशिवाय पर्याय नव्हता.' असं डॉक्टर मॅथ्यू यांनी पीटीआयला सांगितलं. कुठलाही षटकार मान, छाती किंवा डोकं यासारख्या अवयवाला लागला असता, तर तो गंभीर ठरला असता, कारण सहा वर्षांची मुलं इतकी गंभीर दुखापत सहन करु शकत नाहीत, अशी भीतीही डॉक्टरांनी व्यक्त केली. एप्रिल 2012 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पुणे वॉरिअर्समध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात दहा वर्षांच्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर चेंडू लागला होता. बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारतानं इंग्लंडला विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं होतं. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतानं 20 षटकांत 6 बाद 202 धावांचा डोंगर उभा केला होता. बलाढ्य आव्हानासमोर इंग्लंडचा डाव 127 धावांवरच गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. सुरेश रैनाने 63 धावा ठोकल्या होत्या.

संबंधित बातम्या :

VIDEO: रैनाचा सुपर कॅच

चहल हिरो, टीम इंडियाचा इंग्लंडवर 75 धावांनी विजय!

चहल 6 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!

तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणातच मालिका खिशात, नाम है कोहली!

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Captain MI IPL 2027 : मुंबईच्या गादीवर पुन्हा हिटमॅन! कर्णधार बनताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया! सूर्यकुमारचीही 3 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
मुंबईच्या गादीवर पुन्हा हिटमॅन! कर्णधार बनताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया! सूर्यकुमारचीही 3 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
IND vs NZ 2nd Test Day-2 : पाच विकेट्स घेऊन आकाशदीप चमकला, पण बुमराहच्या खात्यात भोपळा! न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर गुंडाळला
पाच विकेट्स घेऊन आकाशदीप चमकला, पण बुमराहच्या खात्यात भोपळा! न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर गुंडाळला
6,6,6,6,6,6... एका षटकात 6 षटकार अन् 2 द्विशतकं! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन युवा फलंदाजांचा धमाका, एकाच सामन्यात असा विक्रम, जो पाहून सगळेच थक्क
6,6,6,6,6,6... एका षटकात 6 षटकार अन् 2 द्विशतकं! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन युवा फलंदाजांचा धमाका, एकाच सामन्यात असा विक्रम, जो पाहून सगळेच थक्क
IND vs NZ 2nd Test Day-2 : आकाश दीपने 4, कंबोजने 2 विकेट्स घेत किवींना हादरवलं; ब्लंडेल मात्र शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
आकाश दीपने 4, कंबोजने 2 विकेट्स घेत किवींना हादरवलं; ब्लंडेल मात्र शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
Embed widget