News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

एलईडी बल्बने शेवंती फुलवण्याचा प्रयत्न, सांगलीत अनोखा प्रयोग

हायब्रीड शेवंती या पिकाची बारा महिने लागवड करुन, उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल यासाठी या नर्सरीत प्रयोग केला जात आहे.

FOLLOW US: 
Share:
सांगली: सांगली जवळच्या तुंग गावात विकास हायटेक नर्सरीच्या माध्यमातून एक वेगळा प्रयोग केला जात आहे. हायब्रीड शेवंती या पिकाची बारा महिने लागवड करुन, उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल यासाठी या नर्सरीत प्रयोग केला जात आहे. एक एकरावरती शेवंती झाडाची लागवड करुन या परिसरात जवळपास 300  बल्ब लावून दिवसासारखा प्रकाश निर्माण केला जातो. यातून कळ्याच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल आणि ठराविक हंगामाबरोबरच वर्षभर झेंडूप्रमाणे मागणी असलेल्या शेवंती फुलांची लागवड करण्यास मदत होईल, या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर हा प्रयत्न सुरु आहे. शेवंती या फूलझाडाचा लागवडीचा काळ हा तसा मुख्यत्वे मार्च, एप्रिल, मे दरम्यान असतो.पण झेंडू प्रमाणे या शेवंती फुलाची वाढती मागणी लक्षात घेऊन सांगलीतील तुंग गावातील विकास हायटेक नर्सरीने फूल झाडाचे पीक वर्षभर उत्तम पद्धतीने कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातूनच शेवंती झाडाच्या भोवती बल्ब लावून झाडाची वाढ चांगली व्हावी आणि कळ्या जास्त याव्यात यासाठी एक प्राथमिक स्तरावर प्रयोग केला जातोय. शेवंती हे साधारण  80-90 दिवसाचे पीक. या पिकाची लागवड केल्यापासून 40 दिवस रात्री असे बल्ब लावून कृत्रिम प्रकाश निर्माण केला जातो.  शेवंती हे वातावरणावर आधारीत असलेले पीक मुख्यत्वे मार्च, एप्रिल , मे मध्ये लागवड केली जाते. मात्र वर्षभर हे पीक घेता यावं यासाठी हा प्रयोग तुंग मधील विकास हायटेक नर्सरी करतेय. एक एकरमध्ये 300 बल्ब बसवून रात्रीत दिवसाप्रमाणे उजेड तयार केला जातो. कळ्यांच्या संख्या वाढवण्यासाठी जास्त प्रकाश जास्त काळ ठेऊन हा प्रयोग केला जातोय.  जी शेवंती सिझनमध्ये लावली जात नाही त्यासाठी हा प्रयोग रोवपाटीका करत आहे. हा  प्रयत्न सध्या प्रायोगिक तत्वावर केला जात असला तरी शेतात रात्रीच्या काळोखात 300 भर बल्ब लावल्याने निर्माण झालेले चित्र  पाहण्यासारखे आहे.
Published at : 10 Oct 2018 02:14 PM (IST)

आणखी महत्वाच्या बातम्या

Amravati Municipal Corporation Election 2026 : भाजपचं रवी राणांच्या युवा स्वाभिमानशी जुळलं, मॅजिक फिगरसाठी अडलं; काँग्रेसकडूनही जोरदार मोर्चेबांधणी, अमरावतीत महापौर कोणाचा?

Amravati Municipal Corporation Election 2026 : भाजपचं रवी राणांच्या युवा स्वाभिमानशी जुळलं, मॅजिक फिगरसाठी अडलं; काँग्रेसकडूनही जोरदार मोर्चेबांधणी, अमरावतीत महापौर कोणाचा?

Horoscope Today 18 January 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर ओढावणार संकट, पौष अमावस्येचा होणार परिणाम; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 18 January 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर ओढावणार संकट, पौष अमावस्येचा होणार परिणाम; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live Updates: अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत, फक्त 250 रुपये भरावे लागणार

Maharashtra Live Updates: अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत, फक्त 250 रुपये भरावे लागणार

Eknath Shinde claims Mumbai Mayor: एकनाथ शिंदेंनी 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावून घेतलं अन् डाव टाकलाच, मुंबईच्या महापौरपदावर अडीच वर्षांसाठी दावा?

Eknath Shinde claims Mumbai Mayor: एकनाथ शिंदेंनी 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावून घेतलं अन् डाव टाकलाच, मुंबईच्या महापौरपदावर अडीच वर्षांसाठी दावा?

Paush Amavasya 2026: कष्ट संपले, आज पौष अमावस्येपासून 3 राशींच्या आयुष्यात मोठा यु-टर्न! सूर्य-चंद्राच्या युतीने पॉवरफुल एनर्जी, समस्या संपणार, उत्पन्न वाढणार..

Paush Amavasya 2026: कष्ट संपले, आज पौष अमावस्येपासून 3 राशींच्या आयुष्यात मोठा यु-टर्न! सूर्य-चंद्राच्या युतीने पॉवरफुल एनर्जी, समस्या संपणार, उत्पन्न वाढणार..

टॉप न्यूज़

Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?

Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य

ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश

ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश