Shivraj Rakhse : शिवराज राक्षेचा महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास कसा होता?
Episode Description
यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब नांदेडच्या शिवराज राक्षे ( Shivraj Rakshe) याने पटकावलाय. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीत शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गाडकवाड (Mahendra Gaikwad) याचा अवघ्या 55 सेकंदात पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या खिताबर नाव कोरलं. शिवराज राक्षेने आपला संपूर्ण प्रवास माझा कट्टावर उलगडला.
माझ्या डोक्यात नेहमीच कुस्ती असायची, महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली आणि आई-वडील आणि वस्तादाच्या कष्टाचं चीज झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने व्यक्त केली. महाराष्ट्र केसरी ही सुरुवात आहे, यापुढे आशियन खेळ आणि ऑलिम्पिक हेच लक्ष्य असल्याचं शिवराज म्हणाला. तो एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होता.























