तर 'संजू' या बोयोपिकमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
2/10
टीझरवरुन रणबीरने संजय दत्तची व्यक्तिरेखा हुबेहुब साकारल्याने सिनेमाविषयी अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे संजय दत्तच्या आयुष्यात महत्त्वाच्या व्यक्तींच्या भूमिका कोण साकारणार हे पाहूया.
3/10
याशिवाय संजय दत्तचा आणखी एक सहकलाकार आणि मेहुणा कुमार गौरवची व्यक्तिरेखा विकी कौशल साकारेल.
4/10
तर परेश रावल संजय दत्तचे वडील अर्थात सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसतील.
5/10
संजय दत्तची एकेकाळची को-स्टार असलेल्या टीना मुनीमची भूमिका सोनम कपूर साकारेल.
6/10
तर 'साजन'मध्येच संजयचा सहकलाकार असलेल्या सलमान खानची भूमिका जीम सार्भ साकारण्याची शक्यता आहे.
7/10
याशिवाय संजयच्या पत्नीची, मान्यता दत्तची व्यक्तिरेखा अभिनेत्री दिया मिर्झा साकारणार आहे.
8/10
या सिनेमात अभिनेत्री मनिषा कोईराला संजय दत्तच्या आईच्या म्हणजेच नर्गिस दत्त यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
9/10
साजन, खलनायक यांसारख्या सिनेमात संजयसोबत एकत्र काम केलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. संजू सिनेमात करिष्मा तन्ना माधुरीच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
10/10
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला संजय दत्तच्या बायोपिकचा टीझर नुकताच रिलीज झाला. सिनेमात रणबीर कपूरने काळानुसार बदलत जाणाऱ्या संजय दत्तची विविध रुपं साकारली आहेत. अभिनेता संजय दत्तचं आयुष्य हे चित्रपटासारखंच आहे. एखाद्या अभिनेत्याच्या आयुष्यावरच सिनेमा बनत असल्याने त्यात इतर कलाकारांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता लागली आहे.