त्यानंतर, फेब्रुवारी 2018 मध्ये विद्या कांबळे यांनी नागपुरातील कोर्टात न्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारला होता. (फोटो – फेसबुक)
2/5
जुलै 2007 मध्ये जोयिता मंडल देशातील पहिल्या तृतीयपंथीय न्यायाधीश बनल्या होत्या. जोयिता यांनी पश्चिम बंगालमधील कोर्टात पदभार स्वीकारला होता. (फोटो – फेसबुक)
3/5
न्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “न्यायाधीशपदासाठी माझी नियुक्ती समाजासाठी सकारात्मक संदेश आहे. तसेच, या निर्णयामुळे तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलले.” (फोटो – एएनआय)
4/5
स्वाती यांचा जन्म आसाममधील पांडू शहरात झाला. स्वाती यांच्या आधी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यात तृतीयपंथीय न्यायाधीश आहेत. (फोटो – एएनआय)
5/5
स्वाती बिधान बरुआ या आसाम राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय न्यायाधीश बनल्या आहेत. त्यांनी शनिवारी सिव्हिल कोर्टात आपला पदभार स्वीकारला. स्वाती यांचे वय 26 वर्षे आहे. (फोटो – एएनआय)