एक्स्प्लोर
शिवसेनेचं मिशन लोकसभा 2019, संभाव्य उमेदवार कोण?
1/5

मुंबईतील भाजप खासदारांविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी शिवसेनेतून अनेक नावं पुढे येत आहेत. मुंबईत एकूण सहा खासदार असून तीन खासदार शिवसेनेचे आहेत तर तीन खासदार भाजपचे आहेत. विद्यमान खासदारांमध्ये दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, उत्तर पश्चिम मुंबईतून गजानान कीर्तीकर यांना पुन्हा संधी मिळू शकते.
2/5

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांसाठी शिवसेनेने 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी महापौर शुभा राऊळ, नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. येत्या गणेशोत्सावाच्या आधी शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणार आहे. शिवसेनेच्या राज्यभरातील 18 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
Published at : 29 Aug 2018 01:16 PM (IST)
View More























