एक्स्प्लोर
जॉनी डेपचा सिनेमा हॅक, ऑनलाईन लीक करण्याची धमकी
1/6

काय आहे रॅनसमवेयर व्हायरस? : अनेक देशात रेनसमवेयर नावाच्या कम्प्युटर व्हायरसला सायबर हल्ल्यासाठी जबाबदर मानलं जातं. यूजर्सकडून पैसे उकळण्यासाठी या व्हायरसचा वापर केला जातो.
2/6

रॅनसमवेअर व्हायरसने जगभरात दहशत पसरवली आहे. त्यातच आता जॉनी डेपचा पायरेट्स ऑफ कॅरेबियन-5 हा सिनेमा हॅक केल्याचा दावा हॅकर्सने केला आहे. पैसे द्या अन्यथा सिनेमा ऑनलाईन लीक करु, अशी धमकी दिल्याची माहिती आहे.
3/6

सिनेमा लीक होण्यापासून रोखण्यासाठी निर्मात्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे, ज्यासाठी निर्माते तयार नाहीत. त्यांनी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआयशी संपर्क केल्याची माहिती आहे.
4/6

अमेरिकेतील प्रसिद्धी टीव्ही मालिका ऑरेंज इज द न्यू ब्लॅक हॅकर्सने ऑनलाईन लीक केली होती. त्यामुळेच हा सिनेमाही पैसे न दिल्यास लीक केला जाऊ शकतो, असं बोललं जात आहे.
5/6

सिनेमा 24 मे रोजी सुरुवातील इटलीमध्ये रिलीज केला जाणार आहे. सिनेमा खरोखर हॅक केला आहे का, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र गेल्या आठवड्यात अशीच एक घटना घडल्यामुळे हॅकर्सच्या या दाव्यावर विश्वास ठेवला जात आहे.
6/6

पायरेट्स ऑफ कॅरेबियन सीरिजचा हा पाचवा सिनेमा आहे. Pirates of the Caribbean: Dead Men Tell No Tales असं या सिनेमाचं नाव आहे.
Published at : 16 May 2017 02:52 PM (IST)
View More























