पावसाच्या हलक्या सरींना प्रारंभ झाल्यावर उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकर जनतेने घरासमोर, टेरेसवर जावून पहिल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
2/7
जोराच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी झालेच, शिवाय तुंबलेल्या गटारामुळे गटारातील पाणीही रस्त्यावर आले.
3/7
ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट आणि वळीवाची हजेरी अनुभवायला मिळाली.
4/7
उष्मा प्रचंड वाढल्यामुळे पाऊस येणार असे वाटत होते आणि साडेचारच्या सुमाराला वळीवाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.
5/7
एक तासभर हजेरी लावून वळीवाने वातावरण गारेगार करून सोडले.
6/7
काही वेळाने पावसाच्या सरी जोरात कोसळू लागल्या आणि सगळीकडे पाणीच पाणी झाले. गाराही पडल्यामुळे गारा वेचून खाण्याचा आनंदही अनेकांनी घेतला.
7/7
बेळगाव शहर आणि परिसरात वळीवाने एक तासभर दमदार हजेरी लावून सगळीकडे पाणीच पाणी केले. सकाळपासूनच उष्मा प्रचंड वाढला होता. घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या बेळगावकरांनी वळीवामुळे सुखद गारवा अनुभवला.