पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट - पंकजा मुंडे यांनी भगवान गडाबाबत फेसबुक पोस्ट अपलोड केली. "हो मी येणार दसऱ्याला तुमच्यासाठी, आपल्यासाठी भगवान गडाची कन्या म्हणून भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी... आणि तुम्ही? तुम्ही येणार ना?" असं पंकजा यांनी म्हटलं आहे.
2/6
तुम्ही भगवानगडावरील बादाबाबत पंकजाताईंशी संपर्क साधणार का? असा प्रश्न नामदेवशास्त्रींना विचारण्यात आला. त्यावर नामदेवशास्त्री म्हणाले, "ती जर माझ्याशी बोलत असेल, तर मला काय हरकत आहे? ती माझी मुलगीच आहे"
3/6
यावर्षीच आडकाठी का? - 12 डिसेंबरला मी गोपीनाथ गडावरुन जाहीर केलं होतं, की यावर्षीपासून भगवानगडावर राजकीय भाषण होणार नाही. जिथं तुमचं अस्तित्व निर्माण झालं (गोपीनाथगड), तिथेच मी जाहीर सांगितलं की इथून पुढे भगवानगडावर भाषण होणार नाही. मग आज हा प्रश्न का? गोपीनाथ मुंडेंना भगवानगडाने आधार दिला, ही चूक केली का गडाने? असं नामदेवशास्त्री म्हणाले.
4/6
तो ठराव ग्रामसभेचा नाही - पंकजांच्या भाषणासाठी दोन-तीनशे ग्रामसभांनी ठराव केल्याचं सांगितलं जातं. मात्र ते ठराव ग्रामसभांनी नाही तर सरपंचांनी केले आहेत. ज्यावेळी ते लोक निवदेन देण्यास आले होते, त्यावेळी त्यांना भक्तांनी रोखलं होतं. माझं मत आहे की भक्तांचा मान पंकजांनी ठेवला पाहिजे. भक्त विरोध करत आहेत हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असं नामदेवशास्त्री म्हणाले.
5/6
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर यावं मात्र त्यांनी भाषण करु नये, अशी अट महंत नामदेवशास्त्री महाराज यांनी घातली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. पंकजा मुंडे यांनी कालच आपण भगवान गडावर जाणार असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्याबाबतची प्रतिक्रिया नामदेव शास्त्री यांनी दिली.
6/6
नामदेवशास्त्री म्हणाले, "पंकजा मुंडेंनी सामान्य भक्ताप्रमाणे गडावर यावं, त्यांना कोणीही रोखणार नाही. मात्र इथे त्यांनी भाषण करु नये. भगवान गड धार्मिक गड आहे, राजकीय नाही. तर गोपीनाथ गड हा राजकीय आहे, त्यांनी तिकडे भाषण करावं". पंकजाला मुलगी म्हणून स्वीकारलंय, मग बापाच्या घरी येण्यासाठी परवानगीची काय गरज? असा सवालही नामदेव शास्त्री महाराज यांनी विचारला आहे.