मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेली पावसाची संततधार थांबायचं नावच घेत नाही. काल दिवसभर पावसाने अक्षरश: मुंबईला झोडपून काढल्यानंतरही, मध्यरात्रीपासून मुंबईत धो धो पाऊस सुरुच आहे. दक्षिण मुंबईसह अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा सर्वाधिक फटका वसई विरार परिसराला बसला आहे. वसईतील अर्नाळा-वसई या राज्यमार्गावरील नाळा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चार फूट पाणी तर प्रत्येक वर्गात एक फूट पाणी तुंबले आहे.
2/8
शाळेजवळील नाळा तलाव पूर्ण भरल्यामुळे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून हे शाळेच्या परिसरात घुसले.
3/8
शाळा मुख्य रस्त्यापासून तीन फूट खाली असल्यामुळे हे पाणी उतारावरून प्रचंड वेगाने शाळेच्या आवारात घुसल्याने शाळेच्या गेटवर धबधबा तयार झाला होता.
4/8
परिसरातील तरुणांनी शाळेचे वर्ग उघडून विद्यार्थ्यांची भिजलेली पुस्तके, खेळणी आणि संगणक व इतर वस्तू उचलून मदतकार्य केले.
5/8
अंगणवाडी विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पोषक आहार म्हणून आलेले संपूर्ण धान्य भिजले आहे.