एक्स्प्लोर
फोर्ब्सच्या 'टॉप-100' श्रीमंतांच्या यादीत पतंजलीचे आचार्य बालकृष्ण
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220138/collage.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![या यादीत चार भारतीय महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यात ओ.पी. जिंदल समुहाच्या संचालिका सावित्री जिंदल, बायोकॉन लिमिटेडच्या प्रमुख किरण मुजुमदार शॉ. हॅवेल्सच्या आणि यूएसवी फार्मच्या अध्यक्षा लीना तिवारी आदींचा समावेश आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220150/womens-forbes.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीत चार भारतीय महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यात ओ.पी. जिंदल समुहाच्या संचालिका सावित्री जिंदल, बायोकॉन लिमिटेडच्या प्रमुख किरण मुजुमदार शॉ. हॅवेल्सच्या आणि यूएसवी फार्मच्या अध्यक्षा लीना तिवारी आदींचा समावेश आहे.
2/11
![सावित्री जिंदल यांच्याकडे 5.2 अब्ज डॉलर संपत्ती असल्याचे सांगण्यात आले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220148/savitri-jindal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सावित्री जिंदल यांच्याकडे 5.2 अब्ज डॉलर संपत्ती असल्याचे सांगण्यात आले आहे.
3/11
![ही यादी प्रकाशित झाल्यानंतर अनेकांना दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. कारण, या 100 जणांच्या यादीतून फ्लिपकार्टचे सह संस्थापक सचिन आणि बिन्नी बंसल यांना या यादीतून बाहेर पडावे लागले आहे. या जोडगोळीने गेल्या वर्षी आपल्या 1.3 अब्ज डॉलर संपत्तीच्या जोरावर 86 व्या स्थानी धडक मारली होती. मात्र यावर्षी त्यांची या यादीतून गच्छंती झाली आहे. याशिवाय टॅक्सटाइलचे उद्योजक बालकृष्ण गोयंका यांनाही या यादीत स्थान टिकवता आले नाही. या यादीत 1.25 अब्ज डॉलर संपत्ती असलेल्यांनाच संधी मिळाल्याने गोयंका यांनाही बाहेर पडावे लागले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220146/sachin-binni.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही यादी प्रकाशित झाल्यानंतर अनेकांना दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. कारण, या 100 जणांच्या यादीतून फ्लिपकार्टचे सह संस्थापक सचिन आणि बिन्नी बंसल यांना या यादीतून बाहेर पडावे लागले आहे. या जोडगोळीने गेल्या वर्षी आपल्या 1.3 अब्ज डॉलर संपत्तीच्या जोरावर 86 व्या स्थानी धडक मारली होती. मात्र यावर्षी त्यांची या यादीतून गच्छंती झाली आहे. याशिवाय टॅक्सटाइलचे उद्योजक बालकृष्ण गोयंका यांनाही या यादीत स्थान टिकवता आले नाही. या यादीत 1.25 अब्ज डॉलर संपत्ती असलेल्यांनाच संधी मिळाल्याने गोयंका यांनाही बाहेर पडावे लागले.
4/11
![या यादीत मुकेश अंबानी यांनी गेल्या नऊ वर्षांपासून आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यांची संपत्ती यापूर्वी 22.7 अब्ज डॉलर होती, आता यामध्ये वाढ होऊन ती 1.5 लाख कोटीच्या घरात पोहोचली आहे. जागतिक यादीत त्यांचा क्रमांक 36 वा आहे. नुकतेच अंबानी यांनी रिलायन्स जिओची घोषणा करुन इतर टेलिकॉम कंपन्यांना जोरदार हदरा दिला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220144/reliance-industries.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीत मुकेश अंबानी यांनी गेल्या नऊ वर्षांपासून आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यांची संपत्ती यापूर्वी 22.7 अब्ज डॉलर होती, आता यामध्ये वाढ होऊन ती 1.5 लाख कोटीच्या घरात पोहोचली आहे. जागतिक यादीत त्यांचा क्रमांक 36 वा आहे. नुकतेच अंबानी यांनी रिलायन्स जिओची घोषणा करुन इतर टेलिकॉम कंपन्यांना जोरदार हदरा दिला होता.
5/11
![तिसऱ्या स्थानी हिंदूजा परिवारच्या श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक यांनी धडक मारली आहे. हिंदूजा परिवाराची एकूण संपत्ती 15.2 अब्ज डॉलर आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220142/hinduja-collage.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिसऱ्या स्थानी हिंदूजा परिवारच्या श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक यांनी धडक मारली आहे. हिंदूजा परिवाराची एकूण संपत्ती 15.2 अब्ज डॉलर आहे.
6/11
![सन फार्माचे दिलीप सांघवी यांनी आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. सध्या त्यांची संपत्ती 16.9 अब्ज डॉलर इतकी आहे. दिलीप सांघवींची सन फार्मा भारतातील मेडिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220140/dilip-sanghvi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सन फार्माचे दिलीप सांघवी यांनी आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. सध्या त्यांची संपत्ती 16.9 अब्ज डॉलर इतकी आहे. दिलीप सांघवींची सन फार्मा भारतातील मेडिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे.
7/11
![देशातील सर्वाधिक टॉप-100 श्रीमंतांची यादी फोर्ब्सने नुकतीच प्रकाशित केली. या यादीत सर्वाधिक उद्योजकांची नावे आहेत. पण आता यामध्ये योगगुरु रामदेव बाबांचे सहकारी आणि त्यांच्या आयुर्वेदिक पतंजली उत्पादनांचे काम पाहणारे आचार्य बालकृष्ण यांनीही एन्ट्री केली आहे. फोर्ब्सच्या मते, या 100 जणांच्या संपत्तीत 10 टक्क्यांनी वाढ होऊन 381 अब्ज डॉलर झाली आहे. या यादीत दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरमध्ये 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220138/collage.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशातील सर्वाधिक टॉप-100 श्रीमंतांची यादी फोर्ब्सने नुकतीच प्रकाशित केली. या यादीत सर्वाधिक उद्योजकांची नावे आहेत. पण आता यामध्ये योगगुरु रामदेव बाबांचे सहकारी आणि त्यांच्या आयुर्वेदिक पतंजली उत्पादनांचे काम पाहणारे आचार्य बालकृष्ण यांनीही एन्ट्री केली आहे. फोर्ब्सच्या मते, या 100 जणांच्या संपत्तीत 10 टक्क्यांनी वाढ होऊन 381 अब्ज डॉलर झाली आहे. या यादीत दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरमध्ये 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
8/11
![या यादीनुसार, भविन, दिव्यांक आणि तुराखिया हे सर्वात कमी वय असलेले श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या त्रियींनी आपली तंत्रज्ञान क्षेत्रातील मीडिया डॉट नेट ऑगस्टमध्ये 90 कोटी डॉलर्सला विकली होती. यातील दिव्यांक आणि भाविन मुंबईच्या जुहू आणि अंधेरीचे रहिवासी आहेत. त्यांनी आपली जाहिरात तंत्रज्ञान कंपनी स्टार्टअप डॉट नेट हे एका चीनी कंपनीला तब्बल 90 कोटी डॉलरला विकून नवा इतिहास रचला. यांची नोंद 9 सप्टेंबर रोजीच्या शेअर बाजारातील गणतीच्या आधारे करण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220135/bhavin-divyank.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीनुसार, भविन, दिव्यांक आणि तुराखिया हे सर्वात कमी वय असलेले श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या त्रियींनी आपली तंत्रज्ञान क्षेत्रातील मीडिया डॉट नेट ऑगस्टमध्ये 90 कोटी डॉलर्सला विकली होती. यातील दिव्यांक आणि भाविन मुंबईच्या जुहू आणि अंधेरीचे रहिवासी आहेत. त्यांनी आपली जाहिरात तंत्रज्ञान कंपनी स्टार्टअप डॉट नेट हे एका चीनी कंपनीला तब्बल 90 कोटी डॉलरला विकून नवा इतिहास रचला. यांची नोंद 9 सप्टेंबर रोजीच्या शेअर बाजारातील गणतीच्या आधारे करण्यात आली आहे.
9/11
![रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदचे आचार्य बालकृष्ण यांनी या यादीत एन्ट्री करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बालकृष्ण यांच्याकडे 2.5 अब्ज डॉलर संपत्ती आहे. बालकृष्ण यांची पतंजलीमध्ये 97 टक्के पार्टनरशीप असून त्यांच्या उत्पादनांनी बाजारात चांगलाच जम बसवल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या या टॉप-100च्या यादीत बालकृष्ण यांचा 48 ला क्रमांक आहे. रामदेव बाबा आणि बालकृष्ण यांनी एकत्रित येऊन 2006मध्ये पतंजली आयुर्वेद कंपनीची स्थापना केली. सध्या कंपनीची बाजारातील उलाढाल 7.8 कोटी डॉलर आहे. रामदेव बाबांचे या कंपनीत कसल्याही प्रकारचे शेअर नसून ते केवळ कंपनीचे ब्रॅण्ड अम्बेसिडर बनून उत्पादनांची प्रसिद्धी करतात. तर दुसरीकडे बालकृष्णच कंपनीचा सर्व कारभार पाहातात. याशिवाय बालकृष्ण 5000 पतंजली आरोग्य केंद्रेही चालवतात. तसेच पतंजली विश्वविद्यालय आणि योग-आयुर्वेद शोध संस्थेचेही काम बालकृष्ण यांच्याकडेच आहे. फोर्ब्सच्या मते पतंजलीला जो नफा होतो, तो सर्व विविध विश्वस्त संस्थांना देणगीच्या स्वरुपात दिला जातो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220133/balkrishna.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदचे आचार्य बालकृष्ण यांनी या यादीत एन्ट्री करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बालकृष्ण यांच्याकडे 2.5 अब्ज डॉलर संपत्ती आहे. बालकृष्ण यांची पतंजलीमध्ये 97 टक्के पार्टनरशीप असून त्यांच्या उत्पादनांनी बाजारात चांगलाच जम बसवल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या या टॉप-100च्या यादीत बालकृष्ण यांचा 48 ला क्रमांक आहे. रामदेव बाबा आणि बालकृष्ण यांनी एकत्रित येऊन 2006मध्ये पतंजली आयुर्वेद कंपनीची स्थापना केली. सध्या कंपनीची बाजारातील उलाढाल 7.8 कोटी डॉलर आहे. रामदेव बाबांचे या कंपनीत कसल्याही प्रकारचे शेअर नसून ते केवळ कंपनीचे ब्रॅण्ड अम्बेसिडर बनून उत्पादनांची प्रसिद्धी करतात. तर दुसरीकडे बालकृष्णच कंपनीचा सर्व कारभार पाहातात. याशिवाय बालकृष्ण 5000 पतंजली आरोग्य केंद्रेही चालवतात. तसेच पतंजली विश्वविद्यालय आणि योग-आयुर्वेद शोध संस्थेचेही काम बालकृष्ण यांच्याकडेच आहे. फोर्ब्सच्या मते पतंजलीला जो नफा होतो, तो सर्व विविध विश्वस्त संस्थांना देणगीच्या स्वरुपात दिला जातो.
10/11
![मुकेश अंबानीचे बंधू अनिल अंबानी यांचाही या यादीत समावेश आहे. ते मुकेश अंबानींच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. त्यांच्याकडे 3.4 अब्ज डॉलर संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल अंबानी गेल्या वर्षी या यादीत 29 व्या स्थानी होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220132/anil-ambani.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुकेश अंबानीचे बंधू अनिल अंबानी यांचाही या यादीत समावेश आहे. ते मुकेश अंबानींच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. त्यांच्याकडे 3.4 अब्ज डॉलर संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल अंबानी गेल्या वर्षी या यादीत 29 व्या स्थानी होते.
11/11
![विप्रोच्या अझीम प्रेमजी यांनी चौथे स्थान गाठले आहे. त्यांची संपत्ती 15.2 अब्ज डॉलर आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22220129/ajim-premji.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विप्रोच्या अझीम प्रेमजी यांनी चौथे स्थान गाठले आहे. त्यांची संपत्ती 15.2 अब्ज डॉलर आहे.
Published at : 22 Sep 2016 10:10 PM (IST)
Tags :
फोर्ब्सअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)