मेघा धाडेसह पुष्कर जोग, सई लोकुर, स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे हे टॉप-6 मध्ये होते. मात्र एक-एक करत तेही घराबाहेर पडले. त्यानंतर केवळ पुष्कर जोग आणि मेघा धाडे टॉप-2 होते. त्यातील अभिनेता पुष्कर जोग स्पर्धेतील रनर अप ठरला आणि मेघा विजेती ठरली.
2/6
3/6
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरलेली मेघा धाडे सध्या फारच आनंदात आहे. कारण बिग बॉसची विजेती म्हणून मिळालेल्या घराचा तिला ताबा मिळाला आहे.
4/6
या घरात प्रवेश केल्यानंतर मेघाला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी तिने कॅमेऱ्यासाठी पोझ दिली.
5/6
नवं घर, नवी सुरुवात....आज मी सिटी ऑफ म्युझिकमधील माझ्या घरात गेले होते, अशी पोस्ट मेघाने फेसबुकवर केली होती.
6/6
मेघा धाडेला चाहत्यांच्या प्रेमासोबतच 18 लाख 60 हजार रुपये आणि खोपोली इथे निर्वाना रिअॅलिटीकडून सिटी ऑफ म्युझिकमध्ये एक आलिशान घर मिळालं.