आयपीएल 2018 मध्ये एखाद्या संघाने उभारलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
2/10
आयपीएल इतिहासातला हा दुसरा सर्वात लो स्कोअरिंग सामना ठरला. कमी धावसंख्या असतानाही प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादने केला.
3/10
हैदराबादच्या प्रभावी आक्रमणासमोर मुंबईचा अख्खा डाव 87 धावांत गडगडला. हैदराबादच्या सिद्धार्थ कौलने तीन, तर राशिद खान आणि बेसिल थम्पीने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
4/10
वानखेडे स्टेडियममधल्या या सामन्यावर उभय संघांच्या गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मुंबईने आधी या सामन्यात हैदराबादचा डाव केवळ 118 धावांत गुंडाळला होता.
5/10
सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा अवघ्या 87 धावांत खुर्दा उडवून, आयपीएलच्या सामन्यात 31 धावांनी सनसनाटी विजय साजरा केला.
6/10
मुंबई इंडियन्सचा मेण्टॉर सचिन तेंडुलकरला काल त्याच्या वाढदिवशी विजयाची भेट मिळू शकली नाही.
7/10
यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेलं 119 धावांचं आव्हानही मुंबईला पेललं नव्हतं आणि तीन धावांनी पराभवाचा सामन करावा लागला होता.
8/10
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवाची या आयपीएल मोसमातली ही दुसरी वेळ आहे.
9/10
सीएसकेने 2009 साली किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना 116 धावांचं आव्हान दिलं होतं. एवढं कमी धावसंख्येचं आव्हानही पंजाबला पार करता आलं नाही आणि चेन्नईने 24 धावांनी हा सामना जिंकला होता.
10/10
आपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्या उभारुन प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याचा विक्रम चेन्नई सुपरकिंग्जच्या नावावर आहे.