यशोधरा राजे शिंदे : वसुंधरा राजे शिंदे यांची बहिण यशोधरा 1977 मध्ये अमेरिकेत गेल्या. त्यांना तीन अपत्ये आहेत, पण कोणीही राजकारणात रस दाखवला नाही. यशोधरा राजे 1994 मध्ये जेव्हा भारतात परतल्या, तेव्हा आईच्या इच्छेनुसार, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि 1998 मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. पाच वेळा आमदारपद भूषवलेल्या यशोधरा राजे शिंदे या शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्रीही होत्या.
2/8
वसुंधरा राजे शिंदे : विजयाराजे शिंदे यांच्या मुली वसुंधरा राजे शिंदे आणि यशोधरा राजे शिंदे यांनीही राजकारणात प्रवेश केला. 1984 मध्ये वसुंधरा राजे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला. त्या अनेक वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्रीही बनल्या होत्या.
3/8
राजमाता विजयाराजे शिंदे : ग्वाल्हेरवर राज्य करणाऱ्या राजमाता विजयाराजे शिंदे यांनी 1957 मध्ये काँग्रेसमधून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्या गुना लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. मात्र केवळ दहा वर्षांतच त्यांचा काँग्रेसमधील रस कमी झाला आणि 1967 मध्ये त्या जनसंघात सामील झाल्या. विजयाराजे शिंदे यांच्यामुळेच ग्वाल्हेरमध्ये जनसंघ मजबूत झाला आणि 1971 मध्ये इंदिरा गांधी यांच्या लाटेतही जनसंघाला इथल्या तीन जागांवर यश मिळालं. स्वत: विजयाराजे शिंदे भिंड मतदारसंघातून, अटल बिहारी वाजपेयी ग्वाल्हेर मतदारसंघातू आणि माधवराव शिंदे गुना मतदारसंघातून खासदार बनले.
4/8
उषा राजे शिंदे : जिवाजी राव आणि विजयाराजे शिंदे यांची दुसरी मुलगी उषा राजे शिंदे या मात्र राजकारणापासून दूर राहिल्या. त्यांनी नेपाळचे राजे बहादूर राणा यांच्याशी विवाह केला.
5/8
पद्मा राजे शिंदे : पद्मा राजे शिंदे या जिवाजी राव आणि विजयाराजे शिंदे यांची पहिली मुलगी. मात्र वडील जिवाजी राव यांच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर पद्मा राजे शिंदे यांचंही निधन झालं. जिवाजी राव यांनी 1961 तर पद्मा राजे शिंदे यांनी 1964 मध्ये अखेरचा श्वास घेतला.
6/8
माधवराव शिंदे : माधवराव शिंदे आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. चार बहिणींमधील ते तिसरे अपत्य होते. माधवराव शिंदे अवघ्या 26 व्या वर्षी खासदार बनले. पण ते जास्त काळ जनसंघात राहिले नाहीत. 1977 मध्ये आणीबाणीनंतर त्यांनी जनसंघ आणि आई विजयाराजे शिंदे यांच्यापासून फारकत घेतली. 1980 मध्ये माधवराव शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि केंद्रीय मंत्रीही बनले. मात्र 2001 मध्ये विमान अपघातात त्यांचं निधन झालं. ज्योतिरादित्य शिंदे त्यांचे पुत्र आहेत.
7/8
ज्योतिरादित्य शिंदे : 2001 मध्ये एका विमान अपघातात माधवराव शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर, ज्योतिरादित्य शिंदे यांनी वडिलांचा वारस सांभाळला आणि काँग्रेसचे शक्तिशाली नेतेही बनले. गुना मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे खासदार बनले. 2002 मध्ये पहिल्यांदा विजयानंतर ज्योतिरादित्य शिंदे एकही निवडणूक हरले नव्हते. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना जोरदार झटका बसला. एकेकाळी त्यांचे सहकारी असलेले कृष्ण पाल सिंह यादव यांनीच शिंदेंचा पराभव केला.
8/8
दुष्यंत सिंह : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांचे पुत्र दुष्यंतही भाजपमध्येच आहेत. सध्या ते राजस्थानच्या झालवाड मतदारसंघातील खासदार आहेत.