दरम्यान, अर्पिता आणि आयुषचं लग्न 18 नोव्हेंबर, 2014 हैदराबादमधील फलकनुमा पॅलेसमध्ये झाली होती. या जोडीने काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला. अर्पिताने 30 मार्च रोजी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. (फोटो : इंस्टाग्राम)
2/9
सलमान खानही आपल्या भाचीला पाहून फार खूश आहे. त्याने ट्विटरवर एक प्रेमळ संदेश दिला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'या सुंदर जगात आयत तुझं स्वागत आगे. संपूर्ण कुटुंबाला सर्वात सुंदर वाढदिवसाच्या गिफ्टसाठी धन्यवाद अर्पिता आणि आयुष.' (फोटो : इंस्टाग्राम)
3/9
येथे काही फोटो आहेत ज्यामध्ये आई अर्पिता आनंदात दिसत असून आयत तिच्या कुशीत आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
4/9
अर्पिता आणि आयुषने 27 डिसेंबर रोजी सलमान खानच्या वाढदिवसाच्याच दिवशी डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला होता. (फोटो : इंस्टाग्राम)
5/9
या फोटोंमध्ये 'आयत' फार गोंडस दिसत आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
6/9
इंस्टाग्रामवर हॉस्पिटलमधून आयतचे काही गोंडस फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे की, 'या सुंदर जगात तुझं स्वागत आहे. तू आमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन आला आहेस. तू सर्वांच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद दे.'. (फोटो : इंस्टाग्राम)
7/9
आयत शर्माच्या जन्माच्या तीन दिवसांनी, त्याचे बाब आयुष शर्माने आपल्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
8/9
अर्पिताचा पती आयुष शर्माने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्सला आनंदाची बातमी दिली. तसेच त्यांनी बाळाचं नाव आयत शर्मा ठेवल्याचंही सांगितलं आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
9/9
सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्माला 27 डिसेंबरला म्हणजेच, सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला.