अन्न आणि औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईचे स्वागत होत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून फळे विकणाऱ्यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत.
3/7
म्हापशात काल रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली केळी जप्त करून नष्ट करण्यात आली होती.
4/7
रासायनिक प्रक्रिया करून फळे विकणाऱ्यांवर आणि प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
5/7
काही ठिकाणची सम्पल देखील घेण्यात आली आहेत. आज सकाळी 6 वाजल्यापासून ही कारवाई करण्यात आली.
6/7
अन्न आणि औषध प्रशासनाने आज पणजी मनपाचे महापौर उदय मडकईकर आणि मनपाच्या बाजार निरीक्षकांच्या उपस्थितीत पणजी मार्केटमधील फळ विक्रेत्यांची अचानक तपासणी करून खराब झालेली आणि रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली फळे जप्त करून ती नष्ट केली.
7/7
रासायनिक प्रक्रिया करुन फळे पिकवून बाजारात विकणाऱ्या दुकानदारांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कडक कारवाई सुरु केली आहे. काल म्हापशात आणि आज पणजी मार्केटमध्ये धाड टाकून रासायनिक प्रक्रिया केलेली फळे जप्त करून ती नष्ट करण्यात आली.