धोनीनं 61 धावा केल्यास तो 9000 धावा करणारा तिसरा विकेटकीपर ठरणार आहे.
2/7
षटकाराच्या विक्रमाबरोबरच धोनी आणखी एक विक्रम आपल्या नावावर करु शकतो. पण त्यासाठी त्याला 61 धावांची गरज आहे.
3/7
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. 398 वनडे सामन्यात त्यानं 351 षटकार ठोकले आहेत. श्रीलंकेचा जयसुर्या हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 270 षटकार ठोकले आहेत. तर क्रिस गेलने 238 षटकार ठोकले आहेत.
4/7
सचिननं 463 वनडे सामन्यात 195 षटकार ठोकले आहेत. तर धोनीनं 280 सामन्यात 193 षटकार ठोकले आहेत.
5/7
वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. आता धोनीकडे सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
6/7
आज दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर धोनीकडे एक सुवर्णसंधी आहे. धोनी आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडू शकतो.
7/7
पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ आता दिल्लीती दुसरा विजय मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.