इरफान खानची आई सईदा बेगम यांचं चार दिवसांपूर्वी जयपूरमध्ये निधन झालं.
2/8
इरफान खानच्या निधनाचं वृत्त समजताच बिग बीं अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
3/8
अभिनेता अक्षय कुमारने इरफानने श्रद्धांजली वाहिली असून त्याने ट्वीट केलं आहे. अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिलं आहे की, 'अत्यंत दुखःद बातमी असून इरफान खानच्या निधनाची बातमी ऐकून फार दुःख झालं.'
4/8
मालिकांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या इरफान खानने हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे.
5/8
इरफान खान मूळचा जयपूरचा असून दिल्लीतील नॅशनल स्रून ऑफ ड्रामा येथे त्याने अॅडमिशन घेतलं होतं.
6/8
इरफान खानने 30 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं असून त्याचा शेवटचा चित्रपट अंग्रेजी मीडियम हा होता.
7/8
'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' या आजाराशी इरफानचा लढा अयशस्वी ठरला. इरफानच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
8/8
बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं आज सकाळी 11 वाजता निधन झालं असून तो 54 वर्षांचा होता.