सत्या - राम गोपाल वर्मा आणि उर्मिला हे जणू समीकरणच होतं. सत्या चित्रपटात उर्मिलाने साकारलेली विद्या भीकू म्हात्रे इतकीच लक्षात राहते.
2/10
रंगीला - राम गोपाल वर्मा दिग्दर्शित रंगीला सिनेमात उर्मिलाने भूमिकेचं सोनं केलं. चित्रपटात एक्स्ट्राचा रोल करता-करता अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या 'मिली'ची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. आमीर खान आणि जॅकी श्रॉफ यांच्याही उर्मिलासोबत मुख्य भूमिका होत्या. या सिनेमासाठी उर्मिलाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालं.
3/10
मासूम - लकडी की काठी, काठी पे घोडा या गाण्यातली उर्मिला कोणाला लक्षात नाही? बालकलाकार म्हणून मासूम चित्रपटात उर्मिला गाजली होती.
4/10
मैने गांधी को नही मारा - डिमेन्शियाग्रस्त वडिलांना सावरणारी त्रिशा उर्मिलाने साकारली होती. अनुपम खेर यांच्यासोबत उर्मिलाच्या भूमिकेचंही कौतुक झालं होतं.
5/10
कौन - कौन हा सिनेमा उर्मिलाने एकटीच्या खांद्यावर पेलून धरला आहे. सायकॉलॉजिकल हॉरर अशा जॉनरचा हा सिनेमा. घरात एकटी असताना टीव्हीवर बातमी लागते शहरात सिरीअल किलर मोकाट सुटल्याची... आणि सुरु होतो थरार.
6/10
जंगल - पुन्हा एकदा राम गोपाल वर्मा. जंगल सफारीवर गेलेल्या एका कुटुंबाचं अपहरण होतं आणि सिनेमाची कथा एक वेगळंच वळण घेते. हॅप्पी एंडिंग असलेला जंगल 'दो प्यार करने वाले जंगल में खो गये' गाण्यामुळे गाजला होता.
7/10
जुदाई - नवरा-बायकोच्या नात्यातली 'तिसरी' व्यक्ती अशी उर्मिलाची भूमिका या सिनेमात होती. पैशांच्या मोबदल्यात ती श्रीदेवीकडून अनिल कपूरचा सौदा करते, अशी काहीशी खल व्यक्तिरेखा. जुदाईसाठी उर्मिलाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालं होतं.
8/10
एक हसीना थी - न्वार-थ्रिलर जातकुळीतला हा चित्रपट सिडनी शेल्डनच्या 'इफ टूमॉरो कम्स'वर आधारित होता. श्रीराम राघवनने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात उर्मिलासोबत सैफ होता. एका गुन्ह्यात अडकलेल्या सारिकाचा प्रवास तिने मांडला होता.
9/10
चमत्कार - शाहरुख खान, नसरुद्दीन शाह यांच्या भूमिका असलेल्या चमत्कार चित्रपटात भूताची गोष्ट होती. आशा भोसलेंनी गायलेल्या 'बिच्छू.. बिच्छू..' गाण्यात उर्मिलाचा नटखटपणा पाहायला मिळाला होता.
10/10
भूत - भूत सिनेमात भूतबाधा झालेली स्वाती उर्मिलाने अत्यंत उत्कटतेने रंगवली होती. या चित्रपटासाठी तिला 'फिल्मफेअर'ने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या ज्युरी अवॉर्डने गौरवलं होतं.