70 वर्षांचा इतिहास बदलून भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करुन बॉर्डर-गावसकर चषकावर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि अखेरची सिडनी कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिल्याने भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली.
2/6
या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाने मैदानावर तुफान जल्लोष केला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चषक घेतल्यानंतर खेळाडूंनी मैदानात आनंदोत्सव साजरा केला.
3/6
या जोडीने विजयाचा आनंद सोबत साजरा केला. सोशल मीडियावर विराट-अनुष्काचे अनेक फोटो शेअर होत आहेत. अनुष्काशिवाय इतर क्रिकेटर्सचे कुटुंबीयही मैदानात आले होते.
4/6
पतीच्या नेतृत्त्वातील भारताच्या कसोटी मालिका विजयाचा आनंद अनुष्काच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी अनुष्काने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
5/6
टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही मैदानात पोहोचली.
6/6
पती विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारताच्या ऐतिहासिक विजयावर अनुष्का शर्माने आनंदाने विराटला मैदानावर आलिंगन दिलं.