एक्स्प्लोर
मनसेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध, रितेश म्हणतो...
1/5

मुद्दा कोणताही असो, कलाकारांनाच पहिल्यांदा लक्ष्य केलं जातं, अशी प्रतिक्रिया अभिनेता रितेश देशमुखने दिली आहे.
2/5

उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय सिनेमात, मालिकांमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला आहे. पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. त्यावर रितेश देशमुखने कलाकारांची बाजू मांडत त्यांचा बचाव केला आहे.
3/5

कलाकार हे सॉफ्ट टार्गेट असतात, जे दुर्दैवी आहे. मुद्दा खरंतर वेगळा असतो, पण हा उपाय नाही. कलाकारांवर बंदी घालणं हाच उपाय असेल तर तो उपाय असूच शकत नाही, असं रितेशने उद्विग्नपणे सांगितलं.
4/5

रितेश देशमुखचा ‘बँजो’ हा सिनेमा 23 सप्टेंबर रोजी देशभरात प्रदर्शित झाला. रवी जाधवने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
5/5

शाहरुखच्या ‘रईस’मध्ये माहिरा खान आणि ऐश्वर्याच्या ‘ए दिल है मुश्लिक’मध्ये फवाद खान असल्याने मनसेने चित्रपटांना विरोध दर्शवत प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकीही दिली आहे.
Published at : 27 Sep 2016 11:40 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























