पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणचे पंचनामे चालू असल्याचं तहसिल कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
2/7
संपूर्ण जिल्ह्यात मिळून पावसाने 842.95 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
3/7
धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 54 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
4/7
कापूस, बाजरी,भुईमूग,मका,कांदा,यांसह फळबागांचं देखील नुकसान झालं आहे.
5/7
साक्री तालुक्यात दोन ठिकाणचे पाझर तलाव फुटले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
6/7
पावसाचा जनावरांनाही फटका बसला. 163 जणावरं दगावल्याची नोंद झाली आहे . तर 72 घरांची पडझड झाली आहे. पाऊस अजूनही सुरूच आहे. पूरस्थिती असल्यामुळे पांझरा, तापी नदी काठच्या गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
7/7
धुळे जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. या पावसाचा साक्री तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय. मुसळधार पावसाने साक्री तालुक्यातील 500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय.