एक्स्प्लोर
मालवणमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू
1/8

2/8

3/8

यात दोन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. अन्य आठ जणांचा मात्र बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुणी आणि सहा तरुणांचा समावेश आहे.
4/8

बुडालेल्या तरुणांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. त्यातील तिघांना वाचविण्यात त्यांना यश आले. या तिघांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
5/8

या भागातील समुद्र धोकादायक आहे. ‘खोल पाण्यात जाऊ नये’ असे फलकही येथे लावले आहेत.
6/8

बेळगावमधील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे 47 विद्यार्थी सहलीसाठी मालवणला आले होते. त्यातील काही जण आज सकाळी पोहण्यासाठी वायरी येथील समुद्रात उतरले. यातील 11 जण बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी किनाऱ्यावरील लोकांनी आरडाओरडा केला. 11 पैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे.
7/8

सकाळी 11.30 वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमधील सर्वजण बेळगावातील मराठा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते.
8/8

सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील वायरी समुद्र किनाऱ्यावर बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
Published at : 15 Apr 2017 02:21 PM (IST)
Tags :
SindhudurgView More























