लेखन हे माझं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. या माध्यमामुळे अनेक माणसं जोडली गेली आहेत. सोलापुरातील डॉ. आनंद पवार हे त्यातलेच एक. कायमच माझ्या लेखनाचं कौतुक करत असतात. आज त्यांनी माझ्यासाठी पुस्तक आणि त्यासोबत सुंदर हस्ताक्षरात पत्र पाठवलं. लिहित्या माणसाला आणखी काय हवं असतं?