महिमा चौधरीला बरं होण्यासाठी मोठा काळ लागला आणि या काळात तिचं बॉलिवूड करियर जवळपास संपलं.
2/8
महिमा सांगितलं की, शस्त्रक्रियेनंतर बरं होण्यासाठी फार वेळ लागला. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तिला उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. या काळात ती घरातच राहिली आणि आपोआपच ती सिनेसृष्टीपासून दूर झाली.
3/8
महिमा चौधरीच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. महिमाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या चेहऱ्यातून काचेचे 68 तुकडे काढले होते.
4/8
अपघातात महिमा चौधरीचा चेहरा पूर्णत: बिघडला होता. शुद्धीवर आल्यावर आरशात स्वत:चा चेहरा पाहिल्यावर तिला जबरदस्त धक्का बसला, ती अतिशय घाबरली.
5/8
ज्यावेळी महिमा चौधरी यशाच्या शिखरावर असताना एका घटनेने तिच्या फिल्मी करिअरला ब्रेक लागला. तिच्या कार एका ट्रकरला धडकली. 1999 मधील या अपघातात तिचा चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
6/8
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाद्वारे महिमा चौधरीची लोकप्रियता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. परदेसमध्ये महिमा चौधरीने गावातील मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती.
7/8
महिमा चौधरीने शाहरुख खानसोबत 'परदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात महिमाच्या सौंदर्य, हास्य आणि अभिनयाचं कौतुक झालं होतं.
8/8
अनेक वर्षांपासून चित्रपटातून गायब असलेली आणि फिल्मी जगतातील झगमगाटापासून दूर असलेली बॉलिवूड अभिने महिमा चौधरीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महिमा चौधरीचे हे फोटो पाहिल्यावर ती आधीपेक्षा आता फारच वेगळी दिसते.