एक्स्प्लोर
In Pics : पहिल्या-वहिल्या महिला अंडर 19 विश्वचषक भारताचा, शेफाली वर्माच्या नेतृत्त्वाखाली जिंकली स्पर्धा
INDW vs ENGW : दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धा भारतीय संघानं इंग्लंडला फायनलमध्ये 7 विकेट्सने मात देत जिंकली आहे.

Team India
1/10

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेत फायनलच्या सामन्यात भारतानं इंग्लंडला मात देत कपवर नाव कोरलं आहे.
2/10

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या फायनलच्या सामन्यात भारतानं सात विकेट्सच्या फरकानं इंग्लंडला मात देत विश्वचषक जिंकला आहे.
3/10

स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतानं ही कमाल कामगिरी केली आहे.
4/10

आधी गोलंदाजी निवडून भारतानं संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं. ज्यानंतर 69 धावाचं माफक आव्हान केवळ तीन विकेट्सच्या बदल्यात 14 षटकात पूर्ण करत सामना आणि विश्वचषक जिंकला आहे
5/10

भारत विरुद्ध इंग्लंड या फायनलच्या सामन्याचा विचार करता सर्वप्रथम नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडला स्वस्तात रोखून निर्धारीत लक्ष्य पार करण्याचा भारताचा डाव होता. कर्णधाराच्या निर्णयाला साजेशी खेळी करत भारतीय महिलांनी सुरुवातीपासून इंग्लंडच्या खेळाडूंना तंबूत धाडणं सुरु ठेवलं.
6/10

17.1 षटकांत संपूर्ण इंग्लंडचा संघ 68 धावांवर सर्वबाद केलं. यावेळी भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम गोलंदाजी केली.
7/10

यामध्ये तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 6 धावा देत दोन विकेट्सही घेतल्या. अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन मन्नत कश्यप, शेपाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. इंग्लंडकडून रॅना हिने सर्वाधिक 19 धावा केल्या.
8/10

120 चेंडूत 69 धावाचं माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी आल्या आल्या स्फोटक खेळी सुरु केली.
9/10

एक चौकार आणि एक षटकार ठोकून कॅप्टन शेफाली 15 धावांवर तंबूत परतली. सेमीफायनलमध्ये कमाल कामगिरी करणारी श्वेताही 5 धावा करुन बाद झाली. पण नंतर सौम्या तिवारी आणि गोगंदी त्रिशा यांनी एक चांगली भागिदारी करत भारताचा विजय पक्का केला. त्रिशा 24 धावा करुन बाद झाली. पण तोवर भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. सौम्याच्या नाबाद 24 धावांच्या जोरावर भारतानं 14 षटकात 69 धावा करत सामना आणि विश्वचषक जिंकला आहे.
10/10

विशेष म्हणजे क्रिकेट इतिहासांत पहिल्यांदाच महिलांचा अंडर 19 विश्वचषक यंदा पार पडला असून तो जिंकत भारतानं इतिहास रचला आहे.
Published at : 29 Jan 2023 08:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
