एक्स्प्लोर
T20 World Cup India Squad : वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माच्या शिलेदारांमध्ये कुणाची एंट्री, कुणाला डच्चू
Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट संघाची आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी घोषणा करण्यात आली आहे. संजू सॅमसन, शिवम दुबे यांना आयपीएल मधील कामगिरीच्या जोरावर लॉटरी लागली आहे.

रोहित शर्मा
1/19

आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून नेतृत्त्वाची संधी रोहित शर्माला देण्यात आली आहे. रोहित शर्मानं पहिला टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये खेळला होता. त्यातील तीन मॅचमध्ये त्यानं 88 धावा केल्या होत्या.
2/19

मुंबईकर यशस्वी जयस्वालला देखील टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली आहे. तो रोहित शर्मासोबत डावाची सुरवात करु शकतो.
3/19

विराट कोहलीला देखील टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली आहे. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येण्याची शक्यता आहे.
4/19

गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळं दूर असलेला भारताचा टी-20 स्पेशालिस्ट खेळाडू सूर्यकुमार यादवला देखील संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादवची मिस्टर 360 अशी देखील ओळख आहे. सूर्यकुमार यादवनं रोहितच्या गैरहजेरीत कॅप्टन म्हणून नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली होती.
5/19

रिषभ पंतनं आयपीएलमध्ये दमदार कमबॅक केल्यानंतर त्याला आता टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं आहे.
6/19

टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह ला संधी मिळाली आहे. जसप्रीत बुमराह काही दिवसांपासून जखमी झाला होता.
7/19

राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन म्हणून केलेल्या दमदार कामगिरीचा फायदा संजू सॅमसनला झाला असून त्याला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं आहे.
8/19

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं देखील कमबॅक झालं आहे. हार्दिक पांड्या सध्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करतोय. मात्र, तिथं त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही.
9/19

चेन्नई सुपर किंग्जच्या टीमकडून यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शिवम दुबेला ऑलराऊंडर म्हणून संघात स्थान मिळालं आहे.
10/19

भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंगवर असेल. अर्शदीप सिंग सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जच्या संघाकडून चांगली कामगिरी केलीय.
11/19

युजवेंद्र चहलनं आयपीएलमध्ये 200 विकेट घेतल्या असून यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं चांगली कामगिरी केलीय. या जोरावर त्यानं टी-20 वर्ल्डकपचं तिकीट मिळवलंय.
12/19

टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाची संधी हुकणार अशी चर्चा होती मात्र निवड समितीनं जडेजावर विश्वास ठेवत त्याला संघात स्थान दिलं.
13/19

कुलदीप यादवला तज्ज्ञ स्पिनर म्हणून संघात स्थान मिळालं आहे. दिलली कॅपिटल्सकडून खेळताना त्यानं चांगली कामगिरी केलीय.
14/19

रवींद्र जडेजा, शिवम दुबे यांच्यानंतर तिसरा ऑलराऊंडर म्हणून अक्षर पटेलला संघात स्थान मिळालंय.
15/19

भारताच्या वेगवान गोलंदाजी ची धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंगसह मोहम्मद सिराजवर असेल.
16/19

रिंकू सिंगला यंदाच्या आयपीएलमध्ये बॅटिंगची फारशी संधी मिळाली नाही. याचा फटका त्याला बसला असून त्याला राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे.
17/19

शुभमन गिलला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळालं आहे. शुभमन गिलला यंदाच्या आयपीएलमधील खराब कामगिरीचा फटका बसलाय.
18/19

आवेश खानला देखील राखीव खेळाडू म्हणून संधी मिळालीय.
19/19

खलील अहमदला राखीव वेगवान बॉलर म्हणून संघात स्थान मिळाली आहे.
Published at : 30 Apr 2024 04:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
बातम्या
बातम्या
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
