एक्स्प्लोर
ICC World Cup Final: 'फ्री पॅलेस्टाइन' म्हणत मैदानावर शिरला, कोहलीच्या खांद्यावर हात टाकला; 'ती' व्यक्ती नेमकी कोण?
India Vs Australia Final : पॅलेस्टाईन समर्थक क्रिकेट चाहत्याने थेट मैदानावर धडक मारली. विराट फलंदाजी करत असताना हा क्रिकेटप्रेमी मैदानात शिरला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने ताब्यात मैदानाबाहेर काढले.

ind vs aus cricket world cup 2023 security breach
1/6

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान क्रिकेट वर्ल्डकपचा फायनला मुकाबला सुरू आहे. या सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
2/6

कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानादेखील एक प्रेक्षक थेट मैदानात शिरला.
3/6

या व्यक्तीने सांगितले की, तो ऑस्ट्रेलियाचा नागरीक आहे. त्याने आपले नाव जॉन असल्याचे सांगितले. विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात शिरलो होतो, असे त्याने सांगितले.
4/6

मैदानात अचानकपणे घुसलेल्या या व्यक्तीला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. त्याने पॅलेस्टाईनचे समर्थन करणारे टी-शर्ट परिधान केले होते. त्याशिवाय Stop Bombing Palestine असा मजकूर लिहिला होता.
5/6

मैदानात शिरल्यानंतर त्याने विराट कोहलीजवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि काही पावले चालला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.
6/6

मैदानावर शिरलेल्या या व्यक्तीला अहमदाबादच्या चांदखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले.
Published at : 19 Nov 2023 05:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
