एक्स्प्लोर
Taekwondo Championship 2023 : कराडच्या प्रिशाची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पटकावलं कांस्यपदक
Asian Cadet Taekwondo Championship 2023 : महाराष्ट्रातील प्रिशा शेट्टीने आशियाई स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Asian Cadet Taekwondo Championship 2023
1/8

आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत साताऱ्याच्या कराड येथील प्रिशा शेट्टीने कांस्यपदक पटकावलं आहे.
2/8

प्रिशा शेट्टीने पदार्पणातच भारतासाठी पदकाची कमाई केली आहे. शुक्रवारी लेबनॉन येथे आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडला.
3/8

प्रिशा शेट्टीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण करण्यासह पदर पटकावण्याची लक्षवेधी आणि विक्रमी कामगिरी केली आहे.
4/8

कॅडेट गटामध्ये पदक मिळवणारी प्रिशा शेट्टी ही महाराष्ट्राची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
5/8

सातारा जिल्ह्यातील खेळाडू कुमारी प्रिशा शेट्टी हिने आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत कॅडेट गट भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्यपदक पटकावलं आहे.
6/8

प्रिशा शेट्टी मागील आठ वर्षापासून एपी स्पोर्ट्स आगाशीवनगर, कराडमध्ये प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये प्रशिक्षक अमोल पालेकर आणि प्रशिक्षक अक्षय खेतमर यांनी तिला मार्गदर्शन केलं आहे.
7/8

सातारा जिल्हा अॅमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन माध्यमातून प्रिशा अगदी कमी वयापासून खेळत आहे.
8/8

ग्रामीण भागातील प्रिशाने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आहे. प्रिशाच्या या यशाचं सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.
Published at : 09 Sep 2023 05:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
