मंडळात समाजसेवी आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदान दाखवणाऱ्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत.
2/6
एवढंच नाहीतर मंडळात पोलिसांच्या वेशभूषेत गणरायाची मूर्ती साकारण्यात आली आहे.
3/6
शशि थरूर यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, 'कोविड-19 थीमवर कोलकातामधील दुर्गेची मूर्ती तयार करण्यात आली आहे. ती खरंच फार सुंदर आहे. ही मूर्ती तयार करणाऱ्या लोकांना प्रणाम.'
4/6
महिषासुराला कोरोनासूर म्हटंलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो काँग्रेस नेते शशि थरूर यांनीही शेअर केले आहेत.
5/6
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी दुर्गा डॉक्टरांच्या रूपात महिषासुराचा वध करणार आहे.
6/6
कोरोनाच्या सावटात संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवावर कोरोनाचा प्रादुर्भावा पाहायला मिळत आहे. ना गरबा, ना उत्सव अत्यंत साधेपणाने देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. दुर्गा पूजेच्या निमित्ताने कोलकाता मधील एका मंडळाने डॉक्टरांना देवीच्या रूपात आणि कोरोना व्हायरसला महिषासुराच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.